सर्व प्रियजन व मित्रपरिवार.....
सर्वांनी आपली स्वताची व इतरांची मनापासून काळजी घ्या.
संपूर्ण जग थांबलय हो.आपणही थोडेफार कुठेतरी थांबायला पाहिजे ना.!
आपण थांबलो तरचं हा आजार थांबेल!.
म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की थोडे दिवस फक्त थोडेदिवस घरातच थांबा!.
मित्रांनो पैसा आज नाही तर उद्या भेटेल किंवा परवा भेटेलचं, परंतु हे मानवी जीवन एकदाच भेटणार आहे......
म्हणून थोडं थांबा व काळजी घ्या.
बाहेरुन फिरुन आल्यानंतर आपले हात व पाय स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करा.
शासनाकडून दिल्या गेलेल्या प्रत्येक सुचनांचे पालन करा.
आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी संचारबंदी लागू करुन घ्या.
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस यंत्रनेला सहकार्य करा.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.
आपलं जिवन अमूल्य आहे त्याची व्यवस्थित काळजी घ्या.
अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डाॅक्टरांना जाऊन भेटा.
शासन मदती व्यतीरीक्त तुम्हाला कोणतीही मदत लागली तर आमच्याशी तत्काळ संपर्क साधा.
लोकप्रतिनिधी म्हणून तुमची मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध आहोत.
आपण व्यवस्थित तर आपलं कुटुंब व्यवस्थित व आपलं कुटुंब व्यवस्थित तर आपलं गाव व्यवस्थित आपलं गावं व्यवस्थित तर आपला तालूका, जिल्हा,राज्य व देश व्यवस्थित राहणार आहे याचं भान ठेवून वागा.
आपण आपल्या शासनास योग्य ते सहकार्य केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे त्यामुळे सर्वांनी मनापासून सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे.
🙏🙏आपलाच🙏🙏
🙏शरद अरुण लाड🙏
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji