सांगली:- कोरोना विषाणूच्या संसर्गाच्य छायेत धोका पत्करून महापालिका क्षेत्रात घरोघर जाऊन सर्व्हे करणाऱ्या आशा वर्कर्सच्या मदतीसाठी महापालिकेच्या नगरसेवकांनी पावणे सहा लाखाची मदत जमा केली आहे यातून महापालिकेच्या १०० आशा वर्कर्सच्या खात्यावर प्रत्येकी ५७५० रुपये जमा केले जाणार आहेत.आज महापौर मा. गिता सुतार आणि सभापती संदीप आवटी यांच्या हस्ते आशा वर्कर्सच्या प्रतिनिधीक धनादेशाचे वाटप करण्यात आले.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणेच्या टीमसोबत आशा वर्कर्सही आघाडीवर राहून काम करत होत्या प्रतिबंधित क्षेत्रात क्षेत्रात घरोघरी जाऊन सर्व्हे करणे तीनही शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करणे अशी कामे या आशा वर्कर्सनी केली शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळत असतानाही त्यांनी आपले कर्तव्य सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडले त्यांच्या कार्याची पावती म्हणून या आशा वर्कर्सना त्यांच्या पगारात वाढीव रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला होता. त्यानुसार त्यांनी नगरसेवकांना आपले एक महिण्याचे मानधन आशा वर्कर्सना बक्षिसापोटी जमा करण्याचे आवाहन केले होते.आयुक्त कापडणीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ५३ नगरसेवकांनी आपले ५० टक्के मानधन तर १० नगरसेवकांनी १००टक्के मानधन देऊ केले. या मदतीची एकुण रक्कम पाच लाख ७५ हजार रुपये प्रशासनाकडे जमा झाले आज या रकमेतून समान वाटप करीत १०० आशा वर्कर्सना ५७५० इतकी रक्कम देण्यात येणार आहे.आयुक्त कापडणीस यांच्या सुचनेनुसार आशा वर्कर्स यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येत आहे. महापौर गीता सुतार स्थायी सभापती संदीप आवटी यांच्या उपस्थितीत आशा वर्कर्सना प्रतिनिधीक स्वरुपात धनादेश सुपुर्द करण्यात आला.यावेळी उपस्थित आशा वर्कर्स यांनी केलेल्या कार्याबद्दल महापौर गीता सुतार ,आयुक्त नितीन कापडणीस, स्थायी सभापती संदीप आवटी,आणि सर्वच नगरसेवकांचे आभार मानत त्या सर्वांना टाळ्या वाजवून असा सलाम दिला व संघटनेच्या वतीने या सर्वांचे मनापासून शतशः आभारी आहे
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji