आ. विनोद निकोले यांना वाढदिवसाच्या लाल शुभेच्छा..!
सन २०१९ विधानसभा निवडणुकीत भारताचा कम्युनिट पक्ष ( मार्क्सवादी ) चे १२८ डहाणू विधानसभा ( अनुसूचित जाती ) मतदार संघातून राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून कॉम्रेड विनोद निकोले निवडून आले आणि पालघर जिल्हातील डहाणू व तलासरी मध्ये कॉम्रेड विनोद निकोले को लाल सलाम, लाल सलाम हा एकच आवाज घुमला.
दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने दिलेले प्रमाणपत्र घेऊन निकोले साो., महाराष्ट्र विधिमंडळ विधानसभा सभागृहात आले आणि मी विनोद भिवा निकोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन, आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन ! अशी शपथ घेतल्या नंतर महाराष्ट्र विधिमंडळ मधील स्वाक्षरी आपल्या जागेवर आसनस्त झाले. तद्नंतर इतर प्रकिया पूर्ण करून महाराष्ट्र विधानमंडळाचे विधानसभा सदस्याचे ओळखचिन्ह आपल्या दर्शनी भागावर लावल्या नंतर कॉम्रेड निकोले आता आमदार कॉम्रेड विनोद निकोले झाले.
आमदार म्हणजे काय ? भारतीय घटनेच्या सातव्या परिशिष्टातील कलम २४६ नुसार आमदाराचं मुख्य काम आहे ते म्हणेज राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे बनविणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करणे. काळ आणि परिस्थितीला एखादा कायदा नुकसानकारक ठरत असेल तर असे कायदे रद्द करूणे किंवा त्या अनुषंगाने चर्चा करणे, घटनेत दुरुस्तीचा अधिकार - घटनेत काही दुरुस्त्यांच्या वेळी किमान निम्म्या आमदारांच्या संमतीचीही गरज असते. त्या वेळी मतदान करून योग्य उमेदवार निवडणे, हे आमदारांचे काम असते. आर्थिक नियंत्रण - राज्याच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवणे, हेही आमदारांचे महत्त्वाचे काम आहे. राज्याचे अर्थविषयक धोरण ठरताना, विविध करांची आणि त्यांच्या दरांची रचना होताना, नवे कर लावताना, काही कर रद्द करताना आमदारांनी धोरणात्मक चर्चा केली पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे. योजनांची अंमलबजावणी करणे - राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे. कामांत येणारे अडथळे दूर करणे, हेदेखील आमदारांचे काम असते. अशा योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचं काम आमदारांनी करावे, अशी अपेक्षा आहे. प्रतिनिधींची निवड करणे - आमदारांना आवश्यक त्या वेळी विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडणे, योग्य वेळी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड करणे ही कामेदेखील करावी लागतात. ती कामे त्यांनी प्रामाणिकपणे आणि सदसद्विवेक बुद्धीने करावे, अशी अपेक्षा असते.
दरम्यान च्या काळात सत्ता स्थापनेचा घोळ आपण सर्वजण जाणतोच, त्या सकाळ - सकाळ चा मा. देवेंद्र फडणवीस आणि मा. अजित पवार यांनी मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राजभवन मध्ये घेतलेला मा. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री पदाचा शपथविधी. जो गोंधळ झाला त्यात अजित पवार नॉट रिचेबल झाले. त्यात अजित पवार सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट मिळाल्या नंतर अजित दादा रिचेबल झाले. त्यात बाजी मारली ती म्हणजे मा. खा. शरदचंद्र पवार साो., यांनी. त्यात त्यांनी शिवसेना - राष्ट्रवादी - कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन करत मा. उद्धव ठाकरे साो., यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्री. यांचा शपथविधी दादर येथील शिवाजी पार्क येथे झाला. त्यात ६ मंत्र्यांना शपथ देत महा विकास आघाडी चे कामकाज सुरु झाले.या दरम्यान मी शाहरुख मुलाणी, मा. आमदार कॉम्रेड विनोद निकोले साो., यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून रुजू झालो. आणि महा विकास आघाडी चे पहिले अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु झाले. त्यात आमदार साहेबांनी अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर काम करत मा. मंत्री विजय राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. तसेच लक्षवेधी च्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सभागृहात मांडले.
त्यात पंचायत समिती च्या निवडणुका लागल्या म्हणून आमदार विनोद निकोले साो., मतदार संघात रवाना झाले. त्यात हि आमदार निकोले यांनी घवघवीत यश प्राप्त केले. तलासरी पंचायत समितीवर लाल झेडा फडकवला. आता महाराष्ट्र विधिमंडळ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. त्यात तारांकित प्रश्नांवर आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांना बोलण्याची संधी मिळाली. ती म्हणजे आदिवासी मुलांचे वसतिगृह व शाळा यावर आमदार निकोले यांनी आपले म्हणणे मांडल्या नंतर आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी अधिकृत उत्तर दिल्या नंतर त्यावर आमदार निकोले यांनी प्रश्न उपस्थित केला असता काही क्षणा साठी मंत्री महोदय थोडे चकीत होत सावरून उत्तर दिले. मग आला हा कोरोना - १९ विषाणू त्यामुळे सभागृह लवकर संपवावे लागले. त्यात आमदार निकोले यांनी महाराष्ट्रातील कोरोना मध्ये आमदार निधी देणारे आमदार म्हणून आपले नाव लवकिक केले त्या इतर आमदारांनी आमदार निधी देण्यास सुरुवात केली. या दरम्यान माझा अनुभव व्यक्त करतो. मी अनेक ठिकाणी काम केले आहे. गेल्या ०८ वर्षांपासून मंत्रालय आणि विधिमंडळातील कामकाजाचा अनुभव अनेक मंत्री, आमदार, प्रधान सचिव, सचिव, उप सचिव, कक्ष अधिकारी यांच्या सानिध्यात बरेच काही अनुभवायला मिळाले, शिकायला मिळाले. पण, मार्क्सवादी कम्युनिट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या कडून व त्यांच्या पक्ष श्रेष्टी करून बरेच इतरांपेक्षा वेगळे अनुभव आले.
सन २०१९ मध्ये महा विकास आघाडी च्या पहिल्या पहिल्या अधिवेशनात म्हणजेच नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भातील मार्क्सवादी कम्युनिट पक्षाशी सलग्न असलेल्या इतर संघटनाचे कार्यकर्ते आपले काम घेऊन आमदार निकोले साो., यांना नागपूर आमदार निवासात येत असे. त्यावेळी आमदार साो., साहेब मला योग्य आपले जोड पत्र तयार करून संबंधित मंत्री यांना निवेदन तयार करण्याचे सूचना देत असे. अशावेळी सभागृहाचे कामकाज संध्याकाळी उशिरा पर्यंत चालत असे. मग विदर्भातील कार्यकर्ते आमदार साहेबांना भेटण्यासाठी येत असे. असे काम करत असताना रात्री कधी ११ तर कधी ०१ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची झूमबल होत असे. मग, स्वीय सहाय्यक म्हंटले की तो थोडा आपल्या साहेबांची काळजी घेणारच. अशात एक दिवसी सकाळी ०६.०० वाजताच गडचिरोली म्हणून काही कार्यकर्ते ( कॉम्रेड्स ) आपला माणूस म्हणून भेटण्यास आले. बेल वाजली मी दरवाजा उघडला असता कार्यकर्ते आम्हाला आमदार साहेबांना भेटायचे आहे. मी आमदार साहेब झोपले आहेत. ०९.०० वाजता या. मी माझी नागपूर विधानभवन कडे जाण्याची तयारी करत होतो. तितक्यात तेच कार्यकर्ते आले. मग आमदार साहेबांची आणि कार्यकर्ते यांची भेट झाली. मी सांगितले सर... हे सकाळी ०६.०० वाजता आले होते. पण, आपण विश्रांती करत असल्याने त्यांना मी ०९.०० वाजता येण्यास सांगितले. आमदार साहेबांना त्याच वेळी मला सूचना केली मी जनतेचा आमदार आहे. कार्यकर्ते मध्यरात्री जरी आले तरी मला उठवायचे. मी दिलगिरी व्यक्त करत ओके सर. म्हणालो. त्या नंतर दररोज किमान १६ तास काम करत असे. लॉकडाऊन मध्ये आदिवासी आमदारांमध्ये सर्वाधिक लोक प्रिय आमदार म्हणून आमदार विनोद निकोले यांनी आपली छाप पाडत आहेत.
लेखक :- शाहरुख मुलाणी, स्वीय सहाय्यक,
आ. विनोद निकोले ( महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य)
मो. क्र :- ९८६७७३३७६६
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji