-----------------------
स्त्रि नसे तु अबला, तु सावित्रीची लेक,
उचल लेखणी हत्यार,
मार फुली अन रेघ |।धृ।।
तुच घडविले या सृष्ठीला
रुप दिले तु वैशिष्ठयाला
शोध लावीला तु शेतीचा
बोध घेतला तु मातीचा
जननी तु नेतृत्वाची
कगार तु मातृत्वाची
तुझ्याच भोवती फिरे ही पृथ्वी,
तु सुर्यासम एक ।।1।।
गत कळपाची होती तु नेती
रुढ होती तव, गण पध्दती
गणमाता आदी माय निवृत्ती
मातृसंस्थांची तु निर्माती
तुच साधीली विकासगंगा
प्राणवायू तु सरीता रांगा
तुझेच आभाळ तुलाच म्हणती
धरतीवर मज फेक ।। 2।।
तुच साहील रुढींची गाथा
सतीप्रथेच्या भस्मी चिता
कित्येक झेलल्या कुभांडी कथा
कैक पोळल्या जुल्मी व्यथा
दासी पाशवी बंदी श्रंखला
मनुस्मृतीच्या अघोरी कळा
तोड तोड तु हो पुढे तु
चाल करुन तु नेक ।।3।।
तुझ्यामुळेच जिजाई शिवबा
तुच सावली रमाई भिमबा
माथा ठेवितो तुझ्या चरणी
सदा राहतील लेकी या ऋणी
बळ दिले तु सुर्याला
गोंजारीले तु चंद्राला
चमकती तारे तुझ्यामुळेच
गर्जे बरसून मेघ ।।4।।
तु ज्योतीची संगीनी साऊ
क्रांतीचे तुझ्या गित गाऊ
विदयेचा दिला वसा दान
युगयुगांचे सुटे गिरान
कोण होती ती सरस्वती
उगाच का गे तिला पुजती
जीणे उध्दारीले या नारीला
का तिच्याशीच हा भेद ।।5।।
ज्ञान यशाची गाथा लिवली
उंच शिखरे काबीज केली
कोण नृतकी गायक जाहली
वैद्यक शासक वैमानीक बनली
अत्याचारी या जुल्मी सत्तेला
जातीभेदाच्या विषमतेला
स्त्रि सत्तेच्या उत्क्रांतीला
येवो भरारी वेग ।।6।।
---- शा. दिपक गोठणेकर
जागतिक महिला दिनाच्या सर्व आया बहिणींना मनापासून शुभेच्छा!
क्रांतिकारी सलाम.!!.सविनय जयभीम..!!!
1 टिप्पण्या
Happy womens day
उत्तर द्याहटवाplease do not enter any spam link in the comment box.
Emoji