आशा व गटप्रवर्तक फेडरेशन नांदेड CITU*आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने देशव्यापी " जेल भरो " ची हाक अ.भा.आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने देण्यात आली होती.

*आशा व गटप्रवर्तक फेडरेशन नांदेड CITU*
आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने देशव्यापी " जेल भरो " ची हाक अ.भा.आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने देण्यात आली होती.त्याचाच भाग म्हणून नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या सि.ई.ओ.यांना घेराव आणि नंतर जेल भरो आंदोलन करण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकार तसेच CEO व मनपा आयुक्त यांच्या विरोधात गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
    जि.प.मध्ये घेराव घातल्याने प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. जि.प.चे आरोग्य अधिकारी मा.डॉ.शिंदे यांनी पुढील शुक्रवारी युनियनच्या नेत्यांसोबत बैठक लावण्यात येईल व स्थानिक सर्व मागण्या सोडविण्यात येतील असे आंदोलकांना अश्वासन दिले. तेव्हा सर्व आंदोलक घोषणा देत जि.प.च्या बाहेर आले आणि नांदेड जिल्हा सत्र न्यायालय आणि जि.प. समोरील मुख्य रस्त्यावर चक्का जाम आंदोलची सुरवात केली.सर्व प्रथम  गटप्रवर्तक ताईंना जाणीवपूर्वक पुर्वीच्या सरकारने पगार वाढी पासून दूर ठेवल्याने फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला.साधारणतः दीड तास मुख्य रस्ता रोखून धरल्या नंतर वजिराबाद पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले.पोलीस वाहन उपलब्ध नसल्यामुळे भव्य रॕली काढून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे वजिराबाद पोलीस स्थानकात नेण्यात आला.सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.बडे साहेबांनी हजारो आंदोलकांची नोंद घेऊन सोडून देण्यात आले.
      आंदोलनाचे नेतृत्व कॉ.विजय गाभणे,कॉ.उज्वला पडलवार,कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.वर्षा सांगडे,कॉ.रेखा धूतडे,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.जयराज गायकवाड यांनी केले तर एस.एफ.आय.च्या वतीने कॉ.प्रा.डॉ.सचिन खडके यांनी मनोगत व्यक्त केले व कॉ.मीना आरसे यांनी आंदोलनास शुभेच्या दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या