कोल्हापूर :- राज्यातील आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे त्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून त्यांना लवकरच योग्य आणि फिक्स मानधन देण्यात येईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची बुधवारी भेट घेतली यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिल्याचे नेत्रदिपा पाटील यांनी सांगितले
दरम्यान कोल्हापूर शहरातील आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने आयुक्त मल्ल्यिनाथ कलशेट्टी यांनीही पुनम कुंभार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले असून सांगली ,सोलापूर महापालिका प्रमाणे ५७५० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे .
आशा व गटप्रवर्तक आम्ही फिक्स मानधन वाढीचा निर्णय घेणार आहोत कोवीड –१९ मध्ये खूप चांगले काम करत आहात तुमचे परिश्रम वाया जाणार नाहीत. असे मंत्री महोदय यड्रावकर यांनी भेटीप्रसंगी सांगितले आहे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनाही मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक या काळ्या फिती लावून काम करत आहेत
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji