शुक्रवार दि १५/०५/२०२० प्राजक्ता फाऊंडेशन
आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा दि १६/०९/२०१९ च्या शासकीय निर्णयानुसार आशा स्वयंमसेविकांना दोन हजार रुपये मानधन वाढ देवून त्याव्यतिरिक्त त्यांच्या मानधनात पाच हजार रुपयाची दरमहा वाढ करावी गटप्रवर्तकांना आशा स्वयंमसेविकाच्या मानधनापेक्षा जास्त वाढ देवून त्यांना त्याव्यतिरिक्त दहा हजार रुपये मानधन वाढ द्यावी. त्यांना कोरोना विषाणू पासून संरक्षक करण्यासाठी सर्व संरक्षक साधने द्यावी. आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तकांना योग्य सन्मानाची वागणूक द्या .कोणत्याही कारणाने आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तकांचा मुत्यू झाल्यास त्यांना पन्नास लाख विमा द्यावा या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने आशा व गटप्रवर्तकांना ११ते १३मे या कालावधीत काळ्या फिती लावून काम करण्याचा आदेश दिला होता
आदेशानुसार आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तकांनी अत्यंत शिस्तिने काळ्या फिती लावून काम केले त्याची महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रानी टि व्ही चँनेल्सनी चांगल्याप्रकारे नोंद घेतली या कालावधीत जालना येथे मा आरोग्य मंत्र्यांना व कोल्हापूर येथे मा आरोग्य राज्यमंत्री यांना स्थानिक नेत्यांनी निवेदन दिले काही ठिकाणी आशा स्वयंमसेविकांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना निवेदन सादर केली या कार्यक्रमाची मंत्रालयाने सुध्दा नोंद घेतली आहे एकुण अपेक्षेप्रमाणे कार्यक्रम यशस्वी झाला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जिवाची तमा न बाळगता व स्वकीय कुंटुबियाचा विरोध पत्करून प्रचंड मानसिक तणावाखाली अत्यल्प मानधनावरील ह्या कर्मचाऱ्यानी राष्ट्रीय व समर्पित भावनेने काम केले हे अतुलनीय आहे ते देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांपेक्षा कमी नाही.आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तकांच्या या मनोधैर्यास आम्ही क्रांतिकारी सलाम करतो. आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक पूर्वी जेवढे काम करत होत्या त्या पेक्षा त्यांना आता जास्त काम करावे लागत आहे. शासन त्यांच्यावर अधिकधिक जोखमीचे कामे लादत आहे .अनेक ठिकाणी आशा स्वयंमसेविका कोरोना विषाणू बाधित झालेल्या आहेत.कित्येक ठिकाणी काम न केल्यास कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या त्यांना देण्यात येते आहे. शासन आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तकांचे खुप कौतुक करते परंतु त्यांच्या वेदना व व्यथाबाबत असंवेदनशील आहे ह्याचा आम्ही विरोध करतो जेथे जेथे आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तकांवर अन्याय होत असेल तेथील माहिती कृती समितीला जरूर पाठवावी कृती समिती त्याबाबत आपल्याला निश्चितपणे न्याय मिळवून देईल आपल्या या आगळा वेगळ्या आंदोलनामुळे काही जिल्हा परिषदांनी व महानगरपालिकांनी त्यांच्या निधीतून आशा स्वयंमसेविका मानधन देण्याचे निर्णय घेतले आहेत
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती पुढील पंधरा दिवसातील घटनांवर बारीक लक्ष ठेवून राहणार आहे पुढील काळात आपल्या मागण्यांसाठी योग्य वेळी पुढील कृती कार्यक्रम ठरवून त्यांची माहिती आपल्याला देण्यात येईल मधल्या काळात आपण आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार, खासदार,जिल्हा परिषदेतील अधिकारी,पदाधिकारी यांना द्यावे
*हम होंगे कामयाब , एक दिन ! स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आम्हाला तुमची काळजी आहे*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji