*राज्यातील गट प्रवर्तकांनाही लवकरच प्रोत्साहन भत्ता मिळणार*
************************
*कोल्हापूर : 27 मार्च 2020 रोजी ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ साहेब यांनी कोरोणा वायरस रोखण्या कामी आशा आणि गट प्रवर्तक याना प्रोत्साहन भत्ता म्हणून अनुक्रमे रुपये 1000 व 500 ची घोषणा करण्यात आली होती, मात्र आज अखेर राज्यातील एकाही गट प्रवर्तक यांना घोषित प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही, त्या बाबतचा पाठपुरावा आशाची कोल्हापूर जिल्हा कमिटी आणि सिटू कोल्हापूर जिल्हा कमिटीने केला होता, त्या मध्ये सिटूचे राज्य सह सचिव काँ भरमा कांबळे यांनी ना हसनसो मुश्रीफ यांना तीन वेळा संपर्क साधला होता तसेच आत्तापर्यंत तीन वेळा निवेदन कागल तालुका कमिटी आणि काँ शिवाजी मगदुम यांचे मार्फत आशा संघटनेच्या नेत्या काँ, नेत्रदिपा पाटील दिले होते,*
*दरम्यान महाराष्ट्रातून गट प्रवर्तक यांचे फोन येत आहेत तसेच राज्यातील नगर पंचायती,नगरपालीका,आणि महापालिका क्षेत्रातील आशा आणि गट प्रवर्तक यांना ही अदयाप घोषित प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही त्यामुळे राज्यातील आशा आणि गट प्रवर्तक यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला होता, म्हणुन गेले तीन दिवस ना मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला जात होता, आज दिनांक २/५/२०२० रोजी त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असून त्यानी गट प्रवर्तक यांच्या बाबत आजच माझ्या खात्याला आणि आरोग्य खात्याला कळवून तसा आदेश काढण्याचे आश्वासन दिले असून नगर पंचायती,नगरपालीका, आणि महापालिका क्षेत्रातील आशा आणि गट प्रवर्तक यांच्या प्रोत्साहन भत्याबाबत नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांना ही तसा आदेश काढण्यासाठी कार्यवाही करतो असे आश्वासन दिले आहे ,त्या मुळे राज्यातील आशा आणि गट प्रवर्तक यांना पुढे काम करणे सुकर होणार आहे,*
*ना, हसनसो मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पुन्हा पुन्हा पाठपुरावा आवश्यक आहे*
*आपले*
*काँ, भरमा कांबळे, सिटू राज्य*
*सह सचिव*
*काँ, नेत्रदिपा पाटील, महाराष्ट्र राज्य, आशा व गटप्रवर्तक फेडरेशन. सह सचिव*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji