जत :- कोरोना मध्ये जीवाची पर्वा न करता सतत काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना त्यांच्या सुरक्षा साठी सुरक्षा साधने  मिळणेे आवश्यक होतेे . त्यासाठी मी मा प्रकाश जमदाडे साहेब यांना संघटनेच्या माध्यमातून आशा व गटप्रवर्तक यांच्या साठी हँन्डग्लोज ची मागणी करण्यात आली होती त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी जत तालुक्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांच्या साठी हँन्डग्लोज उपलब्ध करुन दिले .त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे शतशः आभारी आहे . यावेळी मा प्रकाश जमदाडे साहेब (केंद्रीय रेल्वे बोर्ड सदस्य ) ज्येष्ठ पत्रकार मा दिनराज वाघमारे , तरुण भारत चे पत्रकार किरण जाधव , पुढारी पेपर चे तालुका प्रतिनिधी विजय रुपनुर,SBN न्युज चे पत्रकार सोमनिंग कोळी, शशिकांत हेगडे, वकील सागर म्हमाने अतुल शिंदे इ .सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते