जत :- आज जत नगरपरिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा .देसाई साहेब यांना जत शहरातील आशा वर्कर्स यांना नगरपरिषद कडून प्रोत्साहन भत्ता देण्या संदर्भात कॉ हणमंत कोळी यांनी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
जग भर कोरोना विषाणू मुळे हाहाकार माजला आहे .हे काम करण्यासाठी सर्व प्रथम शासनाला आशा वर्कर्स दिसते या आशा वर्कर्स आपल्या जिवाची पर्वा न करता आपापल्या भागात इनामदारीने काम करत असते .महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील आशा वर्कर्स यांना ग्रामपंचायत स्तरावरुन कोरोना च्या कामाऐ विशेष १००० रु प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे व तो कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तो प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे व इतर ठिकाणी महापालिका, नगरपालिका ,या ठिकाणी आपापल्या परीने आशा वर्कर्स यांना त्यांच्या सेस फंडातून प्रोत्साहन भत्ता अदा केला आहे तरी जत नगरपरिषद ने शहरातील ३३आशा वर्कर्स यांना ही प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा यावर चर्चा झाली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे कि आशा वर्कर्स यांना ही आमच्या नगरपरिषद कडून प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे यावेळी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, सलिम पाच्छापूरे , अतुल शिंदे आशा वर्कर्स ललिता सांवत ,व इतर आशा वर्कर्स इत्यादी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji