*अखिल भारतीय किसान* *सभा, जि. सांगली 1 ऑगस्ट रोजी दूधाला 35 रु. भाव मिळावा यासाठी तीव्र निदर्शने !*
दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन आज राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले त्याचा भाग म्हणुन कवठेमहांळ तहसिलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आला.
महाराष्ट्रातील सुमारे २० जिल्ह्यांत हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात हिरीरीने भाग घेतला आणि आपल्या दुधाचा अभिषेक गावचावडीवर घातला निदर्शने केली.
शेतकऱ्यांना मिळणारे दुधाचे भाव गेल्या चार महिन्यांत ३० रुपये लिटर वरून १७ रुपयांवर घसरले आहेत. ग्राहकांना मात्र ४८ रुपये लिटरने दूध विकले जात आहे. शेतकाऱ्यांचे घसरलेले भाव वाढवून द्या यासाठी आजचे आंदोलन होते.
आजच्या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख सचिव दिगंबर कांबळे, उपाध्यक्ष गवस शिरोळकर, गुलाब मुलाणी, क.महंकाळचे तालुकाध्यक्ष दिलीप शुक्ला यांनी केले.
*अखिल भारतीय किसान सभा, जि. सांगली*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji