आज लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मा प्रशांत आवटे यांना जत शहरातील आशा वर्कर्स यांना कोरोना च्या कामाचा प्रोत्साहन भत्ता नगरपरिषदे कडून मिळावा या संदर्भात कॉ हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
जग भर कोरोना व्हायसर मुळे हाहाकार माजला आहे हे काम करणाऱ्या सर्व प्रथम आशा वर्कर्स आपल्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील  आशा वर्कर्स यांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोनाच्या कामासाठी विशेष १०००रु  प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे व ते कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तो प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे .व इतर ठिकाणी महापालिका, नगरपालिका या आपापल्या परीने आशा वर्कर्स यांना त्यांच्या सेस फंडातून प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे आपल्या जत नगरपरिषद अंतर्गत ३३आशा वर्कर्स काम करत आहेत शासनाकडून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे तरी जत नगरपरिषदने ही आपल्या सेस फंडातून आशा वर्कर्स यांना एप्रिल पासून प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा यासंदर्भात वेळोवेळी जत नगरपरिषदेला भेटून निवेदन दिले आहेतते म्हणत असतात कि आम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात पत्र नाही आम्हाला जिल्हाधिकारी किंवा प्रात अधिकाऱ्या कडून लेखी पत्र आल्या शिवाय आम्ही देऊ शकत नाही असे सांगता  .तरी आपण स्वतः लक्ष्य घालून हा आशा वर्कर्स यांच्या प्रोत्साहन भत्ता विषयी प्रश्न मार्गी लावाल ही अपेक्षा व्यक्त करतो
यावेळी ललिता सांवत,राजश्री कोळी,लता मदने, अर्चना काळे, रुकसाना मुजावर, विद्या साळे इ आशा वर्कर्स उपस्थित होते