आज दि.1 सप्टेंबर 2020 रोजी डफळापूर गावचे धडाडीचे युवक कॉम्रेड हणमंत कोळी यांची कन्या कु.उत्कर्षा हणमंत कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीमध्ये अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. 
प्राजक्ता फांऊंडेशन व  हिराई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल जत यांच्या संयुक्त विद्यमाने डफळापूर येथील लोकप्रिय व सुसज्ज अशा सवदे बंधू हॉल येथे आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी जत पोलीस स्टेशन PI मा.उत्तम जाधव साहेब, कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन PI मा.आप्पासाहेब कोळी साहेब, सन्माननीय डॉ.सुदर्शन घेरडे सर, माजी मार्केट कमिटी सदस्य सांगली मा.अभिजीत दादा चव्हाण, जत पंचायत समिती सदस्य मा.दिग्विजय दादा चव्हाण, डॉ.राजेंद्र झारे सर, डॉ.विनोद माळी सर, डॉ.गुरूशांत माळी व सर्व स्टाफ, आमचे लाडके मालक सवदे उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मा.अशोक सवदे साहेब, कॉ मिना कोळी सरिता पवार ग्रामपंचायत सदस्य मा.मुरलीधर शिंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.विकास (गोटू) शिंदे, आणि सर्व पत्रकार बंधू, आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी या कार्यक्रमाचे नियोजन करणारे गौस मकानदार, अमिर नदाफ,अतुल शिंदे, विशाल शिंदे,दिपक कांबळे नितिन पाटील, अशोक स्वामी, शरद सकट,वृषभ कोळी,या सर्वांनी या आरोग्य शिबाराचे नियोजन केले