सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी जत नगरपरिषद समोर आशा सेविका यांच्या प्रोत्साहन भत्त्या संदर्भात धरणे आंदोलनाला बसण्यात येणार होते पण नगरपरिषदेने संघटनेच्या पदाधिकारी यांना बैठकी साठी बोलावले होते. या बैठकीच्या चर्चातून जत शहरातील 33 आशा सेविका यांना कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र काम करत असल्याबद्दल नगरपरिषद कडून आशा वर्कर्स यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे मंजूर केले आहे व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत आशांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरले आहे या मिटिंग साठी नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देसाई ,उपनगराध्यक्ष आप्पा पवार ,नगरसेवक स्वप्नील शिंदे , निलेश बामणे ,आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी , आशा वर्कर्स ,ललिता सांवत, लता मदने, रेश्मा शेख ,व इतर अनेक आशा वर्कर्स या उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji