आशा वर्कर्स या मार्च पासून अहोरात्र कोरोनाचे काम करत आहेत एक तर ते रोजणदारी प्रमाणे मानधन तत्वावर काम करत आहेत तर त्यांना सुरक्षा साधने देण्यात यावे ,नगरपरिषद कडून प्रोत्साहन भत्ता एप्रिल महिण्यापासून देण्यात यावा असे अनेक मागण्या बाबत पलुस शहरातील सर्व १९ आशा या धरणे आंदोलन २६/१०/२०२० रोजी पासून नगरपरिषद कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार होते आज नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा सुमित जाधव साहेब यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना चर्चा साठी बोलवले या चर्चा तून गेल्या सहा महिण्यापासून कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता दिला गेला नव्हता पण तो आता सहा महिण्याचा प्रोत्साहन भत्ता आता देण्यात येणार आहे आजच ११४००० चा चेक हि काढला आहे व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत कोरोना कामाचे प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे म्हणून सोमवार पासून पलुस नगरपरिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणारे आंदोलनाला स्थगिती नेण्यात आली आहे . या मिटिंग साठी पलुस नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा सुमित जाधव आशा संघटनेचे जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी ,आशा वर्कर्स सिमा कुंभार, रागिणी सुर्यवंशी, मिनाक्षी पांढरे , अश्विनी बाबर ,स्मिता माने ,उज्वला रोकडे,स्नेहा गायकवाड इ आशा वर्कर्स उपस्थित होत्या
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji