आज सांगली महापालीकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासन व महापौर यांचेबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे स्थगीत करण्यात आला. या मोर्चाची सुरवात आमराईपासुन होणार होती. त्यासाठी सर्व आशा जमल्याही होत्या पण तत्पुर्वीच महापालिका  प्रशासनाकडुन चर्चेसाठी बोलावणे आले. व कॉम्रेड उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले. यावेळी महापालीका उपायुक्त मा. स्मृती पाटील मा. महापौर गिताताई सुतार, आरोग्यअधिकारी डॉ. शहा इ. उपस्थित त्यांनी आशांची मुख्या मागणी कावीड प्रोत्साहन भत्ता पाच हजार देण्यात यावा ही होती, ती येत्या महासभेत मंजुर करण्याचे अश्वासन दिले. त्यामुळे मोर्चा स्थगीत करण्यात आला. व 10 तारखेस होणाऱ्या  महासभेत मंजुरी नाही मिळाली तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा  सर्व आशांच्या बैठकीत घेण्यात आला.सांगली मिरज आणी कुपवाड शहर महानगर पालीकेत 200 पेक्षा जास्त 'आशांची' नेमणुक आहे. या सर्व आशा गेल्या 6 महिन्यापासुन कोवीड साठी 12/12 तास राबताना दिसत आहेत. कोविड सारखी साथ आटोक्यात आणण्यात इतरांबरोबर त्यांचाही महत्वाचा वाटा आहे. हे काम करीत असातांना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. पेशंट सापडल्यांतर कोणत्याही वेळी त्याठिकाणी हजर राहण्याकरीता वरीष्ठाकडुन येणारा दबाव ,घरोघरी फिरत असताना संबंधीत कुटुंबाकडुन मिळणारी वागणुक, माहीती न देणे, घरी न येण्यविषयी अर्वाच्य बोलणे हे एका बाजुस होत असताना संकलीत होणारी माहीती देण्याकरीता सेंटरला गेल्यानंतर  वरिष्ठांकडुन देखील हिन वागणुक आजही मिळते आहे. काम करुन सुद्धा कामावरुन कमी करण्याची देण्यात येणाऱ्या धमक्या यासारख्या  परस्थितीला आशा वर्कर्सना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सुरु केल्याप्रमाणे महापालीकेने सुद्धा आशा वर्कर्सना कोवीड भत्ता लागु केला पाहीजे या मागणीसाठी आज सोमवार दि. 19. 10. 2020 रोजी महापालीकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय युनियनच्या वतीने घेण्यात  आला होता. 
महाराष्ट्रात ठाणे, कल्याण-डोबविली, नांदेड वाघाळा महापालीकांनी कोवीड विषेश भत्ता लागु केला आहे. तेथील ठरावाच्या प्रती मा. आयुक्तांना सादर केल्या आहेत. तसे निवेदन 7.9.2020 रोजी आयुक्ताऩा दिले होते. पण दिड महीना होवुन गेला तरी सुद्धा कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. 
सर्व आशांना कामावर आधारीत मोबदला मिळतो. पण कोवीड महामारीत  मोबदला मिळणारी कामे करता न आल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मानधनावर होत आहे. म्हणुन आम्ही या विशेष भत्त्याची मागणी करीत आहोत. त्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा स्थगीत केला असला तरी मागणीकडे महापालीका प्रशसनाने पाहीले नाहीतर पुढील आंदोलन मात्र अधिक तीव्र असेल असा ईशाराही आम्ही देत आहोत.

आपले,

 *कॉम्रेड उमेश देशमुख* 

 *वर्षा ढोबळे* 
 *सुषमा आमरल* 
 *विमल जाधव*