जत: आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची खासदार संजय पाटील यांच्याकडे मागणी
जत : आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करा, अशी मागणी लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने खासदार संजय पाटील यांच्याकडे डफळापूर ता. जय येथे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
डफळापूर येथे खा. पाटील आले असताना संघटनेच्या वतीने हि मागणी करण्यात आली. तसेच आशा व गटप्रवर्तक या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत पण त्यांच्या कामाला काही मोल नाही.आपण एक कृतिशील खासदार आहात. जसे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आशा व गटप्रवर्तक यांना सेवेत रुजू करून घ्यावे असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे आपण ही केंद्रीय आरोग्य मंत्री मा डॉ हर्षवर्धन यांच्या कडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.
देशभरात जवळपास ९ लाख आशा व गटप्रवर्तक महिला काम करत आहेत व महाराष्ट्र मध्ये ७० हजार आशा व ३५०० हजार गटप्रवर्तक या काम करत आहेत.
यावेळी जिल्हा अध्यक्ष कॉ. मिना कोळी जिल्हा संघटक कॉ. हणमंत कोळी नजमा शेख व अन्य उपस्थित होते
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji