#अखेर_प्रयत्नाला_यश 
: #लाल_बावटा_आशा_व_गटप्रवर्तक_युनियन_जि_सांगली
सांगली मिरज कुपवाड* *शहर* *महानगरपालीकेकडुन* *आशा व गटप्रवर्तकांना* *दरमहा* *5000 रु. कोवीड भत्ता* *मंजुर....*

सांगली मिरज आणी कुपवाड शहर महानगरपालीकेत काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना दरमहा 5000 रु. कोवीड भत्ता आज झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला. याचा लाभ महनगरपालीकेकडील 201 आशा वर्कर्स व 1 गटप्रवर्तक यांना होणार आहे.  याबद्दल युनियनच्या वतीने आयुक्त, उपायुक्त महापौर उपमहापौर, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत.
पाठीमागील वर्षी कोवीड महामारी सुरु झाली त्यावेळेसच आम्ही शासनाकडे मागणी केली होती. त्यावेळी शासनाने लगेच प्रोत्साहन भत्ता सुरु केला. तसाच प्रोत्साहन भत्ता स्थानिक स्वराज्य संस्थानी देखील सुरु करावा अशी आमची मागणी होती. त्यास महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्हापरिषदा व महानगरपालीका यांनी प्रतिसाद देवुन कोवीडप्रोत्साहन भत्ता सुरु केला होता. सांगली महापालीकेतील नगरसेवकांनी आपल्या मानधनातील रक्कम देवुन गतवर्षी  आशा वर्कर्सांचा सन्मान केला होता. 
यावर्षीदेखील या महामारीत आशा वर्कर्सच्या कामाचे महत्व ओळखुन त्यांना दरमहा पाच हजार रु. भत्ता सुरु केला आहे. असाच प्रोत्साहन भत्ता केंद्र सरकारने देखील सुरु करावा यासाठी युनियन प्रयत्नशिल आहे. पण निवडणकांना केंद्रस्थानी मानलेल्या केंद्र सरकारला आरोग्यविषयक प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण आशा वर्कर्स आपले काम चोख पार पाडतील. यासाठी केंद्रसरकारच्या विरोधात आपले आंदोलन चालु ठेवतील.
सांगली जिल्हापरिषदेने देखील महापालीकेचे अनुकरण करुन कोवीडप्रोत्साहन भत्ता सुरु करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
पुनश्चा सांगली महानगरपालीकेला आम्ही धन्यवाद देतो

आपले,

 *उमेश देशमुख* 
सरचिटणीस
 *मिना कोळी* 
अध्यक्ष
 *वर्षा ढोबळे* 
महापलिका क्षेत्र अध्यक्ष
 *हणमंत कोळी*
जिल्हा संघटक