अलीकडील काही वर्षांमध्ये डोहाळेजेवणं किंवा बेबी शॉवर्स फार मोठी साग्रसंगीत होताहेत ,
आणि त्यामुळे त्यानंतरच्या दोनतीन दिवसात गर्भवतींना मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढत आहे .डॉक्टरांनी कितीही प्रयत्न केले तरी कधी कधी सातव्या महिन्यात कळा सुटून किंवा गर्भाभोवतीचे पाण्याचे आवरण फुटून प्रसूती होते .अशी काही बाळं जगतात पण काही नाही तग धरू शकत ...

खरंतर डोहाळेजेवण हा खूप छान कॉन्सेप्ट आहे .
डोहाळेजेवणाचा  उद्देश्य गर्भवतीला छान वाटावं हा असतो ,दोन्हीकडील जवळचे कुटुंबीय ,मित्रमैत्रिणी ,जवळचे शेजारी यांच्यासोबत हसतखेळत हा सोहळा व्हावा ,गर्भवतीसाठी खास वेगवेगळे पदार्थ तयार केले जावे ,तिच्या मनाला प्रसन्न वाटेल अश्या भेटवस्तू तिला मिळाव्या अश्या पद्धतीने हा कौटुंबिक सोहळा करणे योग्य पण गर्भवतीला तासनतास अवघडलेल्या अवस्थेत बसून राहणे ,विश्रांतीसाठी वेळ  न देणे हे टाळावे .
खूप निमंत्रित असल्यास बऱ्याचदा गर्भवती स्त्रिया त्रास होत असला तरी कार्यक्रमाचा विचका होऊ नये म्हणून सांगत नाहीत आणि त्यामुळे लवकर उपचार मिळत नाहीत .
अलीकडील काळात वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे ,बऱ्याच प्रेग्ननसीज ह्या precious असतात ,आधीच खूप धोके असतात अश्या गर्भावस्थेमध्ये ..शेवटच्या क्षणापर्यंत सर्व काही सुरळीत होईलच याची गॅरंटी नसते ,अश्यात असे मोठे समारंभ करून गुंतागुंत अजून वाढवण्यात काही पॉईंट नसतो .
मुदतपूर्व जन्मलेली बाळं ज्या आय सी यु मध्ये ठेवली जातात तिथले खर्च खूप असतात .मुदतपूर्व जन्मलेली बाळं आयुष्यभर अशक्त राहू शकतात ,शिवाय बाळ दगावल्यास मातेच्या आणि कुटुंबाच्या मनावर फार आघात होतो .
म्हणून डोहाळेजेवणाचा कार्यक्रम अति बडेजाव न करता ,गर्भवतीची काळजी घेत करावा .
आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा मेसेज जावा .