*शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन*


डफळापूर येथे  27 सप्टेंबर रोजी देशव्यापी भारत बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोदी सरकारच्या कार्पोरेट धार्जिण्या धोरणाचा धिक्कार करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद ची हाक देण्यात आली होती दिल्ली बॉर्डर वर 3 कृषी कायदे रद्द करण्यात यावेत शेती मालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाला 10 महिने झाले आहेत निष्ठूर मोदी सरकारने शेती कंपन्यांच्या दावनीला बांधण्याचे कारस्थान चालवले आहे याचा निषेध करण्यासाठी  डफळापूर येथील बस स्टँड वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
3 कृषी कायदे रद्द करा. सोयाबीन आयात धोरण मागे घ्या. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घ्या. महागाईला आळा घाला. NDRF च्या निकषांनुसार 2020 चा खरीप पिक विमा भरपाई वाटप करा. रेल्वे बॅंक LIC विमान इत्यादी सार्वजनिक संपत्ती व मालमत्तेचे खाजगीकरण थांबवा. सप्टेंबर 2021 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत डफळापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कॉग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सांगली जिल्हा मार्केट कमिटी सदस्य अभिजित चव्हाण, मराठा सेवा संघाचे सुभाष गायकवाड, कॉ हणमंत कोळी, युवा नेते हर्षवर्धन चव्हाण,बळीराजा शेतकरी संघटनेचे सागर चव्हाण,सावध पाटील, अमिर नदाफ, दिपक कोळी, सतिश शिंदे, जंरडीकर, राजु हरिगीरी,सुरज कोळी  संतोष बेंळूखी,यांच्या सह गावातील अनेक  शेतकरी सामिल झाले होते.