आशा व गटप्रवर्तक यांच्या मंजूर केलेल्या मागणीवर वित्त मंत्रालयाची मंजुरी
 
आज झालेल्या वित्त मंत्रालयाच्या कारवाई दरम्यान आशा व गटप्रवर्तक युनियनचे नेते कॉ. राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, दीपिका सहारे, रंजना पौनीकर, कांचन बोरकर यांचे उपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब यांच्या प्रयत्नाने वित्तमंत्री अजित पवार यांच्या सहीने वित्त मंत्रालयाची मंजुरी देऊन आरोग्य मंत्रालयाकडे फाईल सुपूर्द करण्यात आली. उद्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवून आरोग्य विभागाकडे फाईल सुपूर्द करण्याची पूर्ण प्रक्रिया होण्याची संभावना आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान सांगितले. वित्तमंत्री अजित पवार साहेब यांचे प्रधान सचिव सुभाष शर्मा तसेच खाजगी सचिव अविनाश सोरवट यांच्याशी शिष्ट मंडळाने सविस्तर चर्चा केली. उद्या जी आर निघण्याच्या प्रक्रियेला विराम लागेल अशी संभावना व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ साहेब यांचे सोबत चर्चा करताना कॉ. राजेंद्र साठे यांनी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे प्रश्न उत्तम प्रकारे हाताळल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच अंगणवाडीचे प्रश्न व आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुद्धा योग्य प्रकारे हाताळून मार्गी लावावे असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर देत आश्वासन दिले की, अंगणवाडी आणि आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुद्धा लवकरात लवकर निकाली लावण्याचे मी प्रयत्न करणार. असे झीरवळ साहेबांनी सी आय टी यू च्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.