सी आय टी यू संलग्न आशा व गटप्रवर्तक युनियनचे प्रयत्नाने जी आर ची प्रक्रिया पूर्ण
 
नागपूर:-सी आय टी यू चे प्रयत्नाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब यांना सकाळी पासून साकडे घालून संलग्न आशा वर्कर व गटप्रवर्तक युनियनच्या प्रयत्नाने जी आर काढण्याची प्रक्रिया करण्यात आली. संघटनेमार्फत कॉ.राजेंद्र साठे ,प्रीती मेश्राम ,दीपिका सहारे, रंजना पौनीकर, रुपलता बोंबले, कांचन बोरकर, पिंकी सवाईथुल,प्रतिभा मकेश्वर उपस्थित होते. आज दिवसभर चाललेल्या तीन फेरीच्या बैठकीतून तसेच हिरवळ साहेबांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरी करता सुपूर्द करण्यात आली आहे. आशा वर्कर यांना ७ हजार रुपये  व गटप्रवर्तक यांना १० हजार रुपये वाढ, २ हजार रुपये दिवाळी बोनस ऑनलाईन कामाची सक्ती करणे बंद करणे, गटप्रवर्तकांना आशा सुपरवायझर संबोधन कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजित करणे, गटप्रवर्तक यांना आरोग्यवर्धिनी १५०० रुपये निधी मासिक देणे, केंद्र व राज्याचे मानधन एकाच वेळेस दर महिन्याला देणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.