नोंदणी , नूतनीकरणाचे अर्ज मंजुर झालेल्या कामगारांची पावती निघण्याची साईट बंद असल्यामुळे नोंदणी, नुतणीकरण प्रोफाईल पेंडीगच दिसत आहे, त्यामुळे मेडिक्लेम योजनेसह कोणताही लाभकामगारांना घेता येत नाही, त्यामुळे हॉस्पिटलसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत होते, त्यामुळे सदर कामगारांची नुतणीकरण व नविन नोंदणी अर्ज मंजुर झालेल्या कामगारांच्या प्रोफाईलवर आजपासूनच बदल करण्याचे आश्वासन सचिव विवेक कुंभार यांनी लाल बावटा संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले..

घरकुल योजनेच्या शेवटचा ५० हजाराचा हप्ता सुद्धा तात्काळ देण्यात येईल तसेच घरकुल योजनेचे प्रस्ताव सुद्धा तात्काळ मंजुर करण्याचे आश्वासन विवेक कुंभार यांनी शिष्टमंडळाला दिले.३ जुलै रोजी झालेल्या मिटींगमध्ये सचिव विवेक कुंभार यांनी घरकुल योजनेचा शेवटचा ५० हजार रूपयाचा हप्ता ३१ जुलै अखेर पर्यंत जमा होईल असे आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी जुलै अखेर कांही लाभार्थीच्या खात्यावर ५० हजार रूपयाचा शेवटचा हप्ता जमा केलात त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.या निवेदनामध्ये, ९ जुलै २०२५ च्या शासन निर्णयाच्या अनुशंगाने सेवा हमी कायदा लागू करा, यामध्ये नोंदणी व नुतणीकरण ६० दिवस, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक लाभ ९० दिवस, मृत्यु लाभ ३० दिवस, मृत कामगारांसाठीचा अंत्यसंस्कार निधी ७ दिवस, अपघाती/नैसर्गिक मृत्यू झालेल्या नोंदीत  कामगार लाभार्थीचे शव शववाहिनीद्वारे मूळ गावी पाठवणीसाठीचा लाभ ७ दिवसात द्यावा असा शासन निर्णय झाला आहे त्याची अमलबजावणी तात्काळ करावी. अशी मागणी केली होती, त्याच्या अमलबजावणीचे काम सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज मंजुरीसाठी सनियंत्रण समिती गठीत केली आहे. या समितीमुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे लाभ देताना, राजकारणाचा शिरकाव होणार आहे. तो स्थानिक पातळीवर कोणाशी संबंधित आहे याचा विचार करूनच लाभदेण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढवणारी सनियंत्रण समिती गठीत करू नये,, नोंदणी, नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी कांही तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रावरील ३१ मार्च 2026 पर्यंतच्या तारखा फुल्ल झालेल्या आहेत. त्या तात्काळ सुरू करा, लाभाचे अर्ज गेल्या सप्टेंबर २०२४ पासून पेंडिग आहेत, ते तात्काळ तपासण्याचे आदेश द्यावेत, फोन नंबर, बँक खाते नबंर, आधार नंबर, नावे वाढविणे आदी अपडेट्स करण्याच्या सूचना नोंदणी अधिकारी यांनां द्याव्यात, घरकुलासाठी दाखल केलेल्या अर्जाची प्रत्यक्ष तपासणी होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी पुढील कोणतीही कार्यवाही होत नाही, त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, मुलीच्या लग्नाच्या लाभासाठी नोंदीत कामगार पती-पत्नीचे नाव असल्यावरच लाभमिळतो पती-पत्नीपैकी एक मयत असल्यास त्यांचे लाभ सिस्टीम घेत नाही. त्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करावी, घरकुलाचे मंजुर झालेले अर्ज आपल्या कार्यालयाकडुन मंत्रालयामध्ये पाठवलेले आहेत ते तात्काळ मंजुर करावेत, मंडळाच्या परिपत्रकाप्रमाणे जोडलेल्या डॉक्युमेंट शिवाय इतर काहीही चुकीच्या त्रुटी काढल्या जातात असे पत्रक आपण काढले आहे मात्र त्याला स्थानिक अधिकारी दाद देत नाहीत अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा, मेडिक्लेम योजना पूर्ण क्षमतेने चालू करा, त्यामध्ये चांगल्या हॉस्पिटलचा समावेश करा. आदी मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ शिवाजी मगदूम, राज्य कोषाध्यक्ष कॉ प्रकाश कुंभार, उपाध्यक्ष कॉ संदिप सुतार, कॉ के नारायण मुंबई अध्यक्ष, कॉ अँथोनी गँबरीयल आदी उपस्थित होते...