सांगली :- गेल्या वर्षी माजी कामगार मंत्री यांनी बांधकाम कामगार साठी दिवाळी बोनस जाहीर केला होता पण तो अद्याप दिला गेला नाही यासाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दि१४/१०/२०२५ रोजी सहायक कामगार आयुक्त कार्यालय वर मोर्चा काढण्यात येणार आहे.
आपल्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 22 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत, तसेच मंडळाकडे राज्यातील सर्व जिल्ह्यातून लाखो कामगार नोंदीत आहेत, गेल्या वर्षी म्हणजे 2024 साली आमच्या बांधकाम फेडरेशन ने सांगली येथील कामगार मंत्री महोदय याच्या कार्यालयावर हजारो बांधकाम कामगारांचा मोर्चा काढून 10 हजार रुपये बोनस ची मागणी केली होती, मात्र ऐनवेळी विधानसभा निवडणूक लागल्याने घोषित केलेला 5000 रुपये बोनस राज्यातील एकाही कामगारांना मिळाला नाही, त्याचा प्रचंड राग आजही बांधकाम कामगारांच्या मनामध्ये आहे. आपल्या सरकारने बोनस ची घोषणा करूनसुद्धा त्याची अंमलबजावणी केलेली नाही. ही कामगारांची शुद्ध फसवणूक आहे.
तसेच गेली 2 महिने नोंदणी नूतनीकरणाचे काम ठप्प आहे, सप्टेंबर 2024 पासून लाभाचे अर्ज पेंडिंग आहेत, जुलै 2025 पासून R O नी या लाभाच्या अर्ज तपासणीवर बहिष्कार घातला आहे. रिनिवल चे सर्व अर्ज विनाकारण आणि काही चुकीच्या त्रुटी काढून रिजेक्ट केले जात आहेत, नवीन आणि रिनिवल अर्ज व्हेरिफीकेशनसाठी 5 ते 6 महिन्याच्या तारखा पडत आहेत, घरकुल चे अर्ज वेळेत तपासले जात नाहीत एकूणच सर्व अधिकारी ही कामे करणेस टाळाटाळ किंवा विलंब लावत आहेत, म्हणून राज्य सरकार आणि मंडळाच्या या कामगार विरोधी भूमिके विरोधात खालील मागण्या करीत आहोत.

          मागण्या
1) 2025 च्या दिवाळीत बांधकाम कामगारांना 15000 रुपये बोनस मिळाला पाहिजे.
2) गेली दोन महिने बंद असलेले नोंदणी, नूतनिकरण आणि लाभाची प्रकरणे दिवाळीपूर्वी निर्गत करा.
3)नवीन भांडी सेट देणेची कार्यवाही ताबडतोब चालू करा.
4) चुकीच्या त्रुटी काढणाऱ्या R O यांच्यावर दांडात्मक कारवाई करा.
5) घरकुल आणि लाभाचे अर्ज दिवाळी पूर्वी मंजूर करा.

या मागण्यांची अंमलबजावणी आठ दिवसाचे आत करावी तसे न झालेस आम्हाला आपल्या कार्यालयावर सोमवार दिनांक 13/10/2025 रोजी बांधकाम कामगारांचा प्रचंड मोर्चा काढून आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी. यावेळी कॉ हणमंत कोळी, प्रशांत नाईक, समीर नदाफ, निलेश पवार, विजय कांबळे इ मान्यवर उपस्थित होते 

        आपले