शेतकऱ्यांना लॉटरी! आता मिळणार 1 लाख 60 हजार रूपयांचं बिनव्याजी कर्ज*

*शेतकऱ्यांना लॉटरी! आता मिळणार 1 लाख 60 हजार रूपयांचं बिनव्याजी कर्ज*

शेतकऱ्यांना आता पशुपालनासाठी 1लाख 60 हजार रूपयांचा बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. ज्यांच्याकडे  किसान क्रेडीट कार्ड असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहेे. हे कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक अर्ज तालुका शेती विकास अधिकाऱ्याकडे द्यावा लागेल. अर्ज दिल्यानंतर तात्काळ शेतकऱ्याला हे कर्ज मिळेल.

*हे कर्ज फक्त कुकूटपालन, दुधाळ पशुधन, शेळी, मेंढी आणि मत्स्यपालनासाठी मिळणार आहे. या मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा 1 लाख 60 हजार रूपये एवढी असणार आहे. या कर्जासाठी शेतकऱ्यांना आपला सात-बारा उताऱ्यासह वैयक्तीक माहिती पशुधनाची संख्या इत्यादी माहितीचा एक पानी अर्ज पंचायत समितीमधील तालुका पशुधन अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.*

या योजनेमुळे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना 50 आणि टक्के अनुदान योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल किसान क्रेडीट कार्डद्वारे मिळणार असून ,100 टक्‍के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय सुरू करणे शक्‍य होणार असल्याची माहिती अतिरिक्‍त पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.

💥💥💥

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या