पावसाच्या अनियमिततेमुळे शेती परवडत नाही म्हणून ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्म)व्यवसाय सुरू केला आहे.सदर व्यवसाय चालू करण्यासाठी सोसायटी,पतसंस्था, बँकामधून कर्ज घेऊन तसेच घरातील सोने गहाण ठेवुन भांडवल उभे केले आहे.अशात बॉयलर चिकनमुळे साथीचा रोग(कोरोना) होतो या अफवेमुळे पोल्ट्री मधील बॉयलर कोंबडी चा उठाव ठप्प झाला आहे.बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी हतबलतेने 30 रुपयास एक बॉयलर कोंबडी या दराप्रमाणे विक्री केलेली निदर्शनास आली.यामुळे पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडकळीस आला आहे.कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाले आहे.तरी शासनाने त्यांना त्वरितआर्थिक मदत जाहीर करावी तसेच प्रतिवर्षी पोल्ट्रीधारक ग्रामपंचायतीस जो वार्षिक कर देतात त्यात व पोल्ट्रीसाठी वर्षभर वापररण्यात आलेल्या विजेचे बिल यात संपूर्ण सूट मिळावी.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji