सध्याच्या घडीला ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडून भाजपात सामील झाला.......डायरेक्ट नेता झाला....पुढे काही दिवसात येऊन ठेपलेल्या राज्यसभेसाठी त्याची वर्णी लागणार........ मंत्रिपद ही मिळेल!!
काही नेते भाजप सोडून 'युवकांना वाव नाही', म्हणून काँग्रेस जॉईन करतील व डायरेक्ट नेते होतील, झालेले आहेत, तिकीट मिळेल, मंत्रिपद मिळेल.......मिळालेलं आहे.
हीच अवस्था इतर पक्षांची आहे. स्थानिक नेते, पक्षात आयात निर्यात होणे वा करणे, हा खेळ सध्या सुरू आहे. नेता पक्ष सोडून गेला की गद्दार, व हिताचं बोलला की खुद्दार!! खरं तर पक्ष सोडावं की राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कोणताही नेता हा कसल्याही पक्षाला कायम बांधलेला नाही हे जेव्हढे सत्य आहे, तेव्हढेच सत्य हे राजकीय पक्षांची विचारसरणी सुद्धा आहे. परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षाचे नेते जेव्हा पक्षबदल करतात तेव्हा त्या नेत्यांची ठराविक अशी विचारसरणी नाही, हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे, विशेषकरून कार्यकर्त्यांनी.
काँग्रेसचे नेते जसे भाजपात प्रवेशीत होतात तसेच भाजपचे सुध्दा आहेत, यांचा हेतू शुद्ध जनसेवा की सत्तालोलुपता हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
मूळ मुद्दा वेगळा मांडायचा, तो म्हणजे 'कार्यकर्ता'
कार्यकर्ते हे तनमनाने व धनानेसुद्धा प्रामाणिक काम करतात बढती मिळेल, जनसेवा करायची संधी मिळेल या हेतूने किंवा आणखी स्वहेतुने सुद्धा. कित्येक वर्षे पक्षासाठी झटतात. मात्र ऐन वेळेस आयात केलेले नेते........कसल्याही प्रकारचं कार्यकर्त्यांसारखे कष्ट न करता डायरेक्ट नेते बनतात. का????
बारकाईने लक्ष दिल्यास आढळून येईलच.....सत्तेची मलाई खाण्याचं काम विशिष्ट घराणे वर्षानुवर्षे करत आलेली आहेत. व अशा नेत्यांना पोसण्याचं काम शुद्ध भांडवली व फासीवादी पक्षांनी केलं आहे. 'कार्यकर्ता' हा 'कार्यकर्ताच' राहावा....व लांच्छन लागू नये म्हणून एखाद्यास बढती पण दिलेली दिसेल.....मात्र प्रामाणिक काम करणाऱ्याला.....जिंदाबाद-मुर्दाबाद, व सतरंज्या सोडून काही हँशील नाही.
इकडचे तिकडे, तिकडचे इकडे। गद्दार-खुद्दार झालेला तर, खुद्दार-गद्दार झालेला. जिंदाबाद!!मुर्दाबाद!!
तुमच्यासमोर असलेल्या पक्षांमध्ये आयात व निर्यात झालेल्या नेत्यांची यादी तपासून पहा. आलेले-गेलेले नेते त्या-त्या पक्षात कार्यकर्ताच्या रुपात काम करून मोठया पदावर जातायं की , कार्यकर्त्यांना आदेश देतायं??? असा एकही नेता शोधून सापडणार नाही!! असे नेते जनतेला तरी काय बांधील राहतील?? धर्मनिरपेक्ष असणारा नेता कधी धर्मांध जहाल भाषणं करेल सांगता येत नाही.
तुम्ही कम्युनिस्टांना बघितलं आहे काय??? जरूर कम्युनिस्ट नेते सुद्धा पक्ष सोडून इतर पक्षात गेलेल दिसतील किंवा वेगळी चूल मांडून निवडणून लढून विजयी सुद्धा दिसतील. असू शकते, झालेलं आहे.
मात्र इतर पक्षातील कोणत्याही नेत्याला माकपने डायरेक्ट नेता केल्याचं दिसणार नाही, जनतेवर आणून लादल्याचं सापडणार नाही. कार्यकर्ता असो नेता असो. कष्टकरी जनतेच्या-विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लढून माकपचा एक एक साथी तयार झाल्याचं दिसेल. कुण्या इतर नेत्याला माकपचा सदस्य व्हायची जरी इच्छा असली तरीही त्याला सामान्य कार्यकर्ता म्हणून जनसंघटनेत काम करावं लागते. त्याची मेहनत व प्रामाणिकपणा हीच त्याच्या बढतीचे आवश्यक गुण. मार्क्सवादी पक्षातील पदाधिकारी हा तेव्हढाच प्रामाणिक स्वयं शिस्तीने बांधलेले दिसेल. सामान्य कार्यकर्ताला सुद्धा मोठंमोठ्या नेत्यांची बेशिस्ती बद्दल तक्रार करण्याची व कार्यवाही झाल्याची उदाहरणे सापडतील. इतर पक्षात असा प्रामाणिकपणा दुर्मिळ आहे.
इतर पक्ष हे भांडवलदारांच्या देणग्यांवर चालून त्यांची इमानेइतबारे सेवा करतांना दिसतील तर माकप हा कष्टकऱ्यांच्या देणगीने चालणारा व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. स्वयंशिस्त, प्रामाणिकता, व वैचारिक बांधीलकी जणू माकपच्या कार्यकर्त्यांचं भूषण आहे.........जे इतर पक्षात क्वचित दिसेल..............
#ममता_पाचोडकर_SFI_जालना
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji