*बेवनूर_ता_जत_येथील वंचित ३१ शेतकर्यांच्या बॅक खात्यात २७००२० रूपये जमा संभाजी ब्रिगेडच्या मागणी ला यश आंदोलना अगोदरच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या वंचित शेतकर्यांना अनुदान बॅक खात्यात जमा करण्यात आले आहे. दि १८-०२-२०२० रोजी संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री श्रेयश नाईक, शंकर पारेकर, अॅड.मदन नाईक, किरण सरगर, बयाजी सरगर यांनी बेवनूर ता जत येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या वंचित शेतकर्यांना अनुदान मिळणे बाबत निवेदन जतचे तहसिलदारसाहेबांना देण्यात आले होते. त्यामुळे बेवनूर येथील वंचित शेतकर्यांच्या बॅक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत . जत तहसिलदारसाहेब सचिन पाटील यांनी त्वरित अनुदान जमा केल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री श्रेयश नाईक, जिल्हाउपाध्यक्ष डॉ सुधिर नाईक, अॅड.मदन नाईक व शेतकरी उपस्थित होते.*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji