विटा:- गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा चालू आहे. अद्याप त्या संदर्भात आजवर कोणत्याही ठोस निर्णय झाला नाही म्हणून आज ९मार्च २०२० रोजी त्याच मागण्या घेऊन विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकरी मोटर सायकल रँली व्दारे मागण्या घेऊन विटा प्रांत कार्यालय वर मोर्चा काढण्यात आला. विजापूर गुहागर महामार्गाचा आजपर्यंत कसलाही प्रकारचा सर्वे झालेल्या नसून भुमिअधिग्रहन २०१३च्या कायद्यानुसार महामार्गमध्ये बाधित होणाऱ्या जमिनी ,घरे,झाडे, बोअरवेल, पाईप लाईन या सर्वाचा सर्वे जाईन कमिटीने करणे अपेक्षित असताना आतापर्यंत कसलाही प्रकारचा सर्वे न करता बाधित शेतकऱ्यांना कसलाही प्रकारची पूर्व सुचना न देता शेतकऱ्यांच्या हद्दी मध्ये बेकायदेशीर काम चालू आहे यासंबंधी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने २१जानेवारी२०२० रोजी भिवघाट येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते त्या दरम्यान झालेल्या चर्चमध्ये कार्यकारी अभियंता कोल्हापूर मा सांगावकर साहेब यांनी १५ दिवसात बाधित क्षेत्रातील सर्वच काम सुरू करण्याबद्दलची हमी दिली होती. परंतु दीड महिना उलटून गेला तरी कसलाही प्रकारचे शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत विचार न करता उलट महामार्गाचे कंत्राटदार शेतकऱ्यांना दमदाटी करून महामार्गच काम पूर्ण करण्याचा घाट घालत आहेत आम्ही आपणास विनंती करतो कि आपण गांभीर्याने या बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय व मुजोर व बेकायदेशीर काम करणाऱ्यांच्या वर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा तमाम मागण्यांसाठी यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे देत आहेत असे किसान सभेच्या वतीने देण्यात आले यावेळी किसान सभेचे जि अध्यक्ष कॉ उमेश देशमुख, जि सचिव कॉ दिगंबर कांबळे, गोपीनाथ सुर्यवंशी, भानुदास सुर्यवंशी,बबन हसबे इत्यादी सर्व व मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनाला उपस्थित होते
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji