*समृद्धी महामार्ग मुळे प्रश्नचिन्ह शाळा उध्वस्त*

*गुन्हेगारी कमी करणाऱ्या शाळा पुन्हा उभी राहील का?*

*फासेपारधी मुले वळत आहे भीक मागण्याकडे*

*मुंबईच्या MSRDC कार्यालयासमोर भरवणार शाळा*

श्री मतीन भोसले यांनी शिक्षकाची नोकरी सोडून फासेपारधी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा सुरू केली. सध्या या शाळेत 471 मुले शिक्षण घेत आहेत. ही मुले आधी सिग्नल/रेल्वे स्टेशन/यात्रा/देवस्थान येथे भीक मागणे,कचरा/प्लास्टिक/भंगार वेचणे/पाकिटमारी/छोट्या मोठ्या चोऱ्या करणारी आहेत. सगळं शासनाचे कोणतेही अनुदान नसताना लोकवर्गणीतून सर्व काही सुरळीत सुरू होते.
सगळं थोडं थोडं सुरळीत होत असतानाच समृद्धी महामार्ग शाळेच्या मुळावर आला. अगदी शाळेच्या मधून हा महामार्ग जात आहे. शाळेची इमारत, वाचनालय, खेळाचे मैदान, 2 विहिरी व जवळपास 250 झाडे यात गेली.
सुरळीत सुरू असलेली शाळा अचानक सैरभैर झाली.पुन्हा आंदोलन सुरू केले, सरकारने बाजूची जागा देण्याचे आश्वासन दिले. समृद्धी महामार्ग कंत्राटदाराने CRC फ़ंड मधून निधी देण्याचे कबूल केले. त्यात शाळेसाठी बांधकाम, विहीर व संरक्षण भिंत उभारून देण्याचे ठरले.
विहीर खोदून झाली पण पाईपलाईन नसल्याने पाणी आणता येत नाही. बांधकाम ही अर्धवट झाले.
शाळेच्या 100 फुटावरून रस्त्याचे काम अहोरात्र सुरू आहे. त्यामुळे प्रचंड धुरळा उडत असतो. पोकलेन व ट्रक ची ये जा यामुळे हादरे बसत आहेत. धुरळा उडत असल्याने होत असलेल्या धुळीमुळे मुलांना श्वसनाचे आजार जडले आहेत. स्पोर्ट साठी बांधलेला एक पिलर हादरे बसून बसून कोसळला व एक 11 वर्षाची मुलगी दुर्दैवाने मृत्युमुखी पडली. 
स्थानिक राजकारणी पुन्हा नव्या जोमाने पुढे आणले, मतीन भोसले वर 304 चा गुन्हा दाखल झाला. त्यांना अडकविण्यासाठी शक्य तो प्रयत्न करण्यात आला. 
आताही सगळी परिस्थिती अतिशय बिकट आहे. रोजच्या जेवणाचा प्रश्न तर आहेच पण या महामार्गामूळे नवीनच प्रश्न निर्माण झाले आहेत.
सरकारने जमीन देण्याची घोषणा केली होती परंतु अद्यापही काहीही पदरी पडले नाही. शाळेला आदिवासी आश्रमशाळा म्हणून मान्यतेचा प्रस्ताव कित्येक महिने झाला पडून आहे. 

यामुळे श्री मतीन भोसले यांनी समृद्धी महामार्गावर ,नंतर महामार्ग कंपनिसमोर व आता MSRDC च्या मुंबई येथील ऑफिस समोरच शाळा भरवणार आहे.

सरकार शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लक्षावधी रुपये खर्च करते. इथे 471 फासेपारधी समाजाची मुले की जो समाज गुन्हेगार म्हणून ओळखला जातो त्यांची मुले शिकत आहेत. भीक मागणारी, कचरा/भंगार वेचणारी, पाकिटमारी/ छोट्या मोठ्या चोऱ्या करणारी मुले गोळा करून शाळा सुरू आहे. एक मोठे समाज परिवर्तन वादी कार्य सुरू आहे. पुढे घडणारी गुन्हेगार मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य शाळेच्या माध्यमातून सुरू आहे.
------------
श्री मतीन भोसले, प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा, मंगरूळ चव्हाळा, ता.नांदगाव खंडेश्वर, जी.अमरावती 
9096364529