राष्ट्रीय आपत्ती चा सामना करण्यासाठी नांदेड शहरी आशा सज्ज #
नांदेड - संसर्गजन्य करोना विषाणू चा सामना आणि जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नांदेड शहरातील जंगमवाडी दवाखान्यात आशांचे प्रशिक्षण/ शिबीर आज दि.१९ मार्च रोजी घेण्यात आले.
शिबिरा नंतर सीटू चे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी तथा आशा व गट प्रवर्तक फेडरेशनचे सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी उपस्थित आशा सोबत चर्चा केली आणि आलेल्या आपत्तीचा सामना करण्यासाठी युनियन पुर्ण सहकार्य करणार असून  कसल्याही प्रकारची हयगय न करता सर्व आशा कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्य सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सांगितले ....