*आशा* सर आपल्या सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागातील आशांची संख्या १९०० व गटप्रवर्तक यांची संख्या ९५ व शहरी भागातील आशा १०० एवढे आशा व गटप्रवर्तक आहेत पण आज जगभरात कोरोना विषाणू मुळे हाहाकार माजला आहे .आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी anm ,mpw , यांची संख्या फार कमी आहे कोणतेही काम असो सर्व प्रथम डोळ्यासमोर आमची आशा वर्कर्स दिसते आता आशा ही आरोग्य विभागातील कणा बनली आहे या सर्व आशा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत तरी अधिकारी यांनी काम सांगितले की ते काम करत असतात पण आता सर्वत्र आशांना मासिक त्रास होत आहे गावपातळीवर तर आशांना कोणी ही कामे सांगतात न काम सांगणारा पापी आहे रात्री अपरात्री आशांना फोन करून माहिती मागवली जात आहे . ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, हे तर आशांच्या मागे हात धुवून मागे लागले आहेत . या त्या आता मानसिक दृष्ट्या खचल्या आहेत ना त्यांना सुरक्षा साधने देण्यात आले ना त्यांची आरोग्याची काळजी घेतली जात आहे शेवटी त्यांचा ही जीव आहे त्यांनी लोकांची काळजी घ्यायची पण त्यांच्या आरोग्याची साधी विचारपूस सुद्धा होत नाही हे मोठे दुर्भाग्य आहे . काल परवा तर मा मुख्यमंत्री साहेब यांनी तर आशांना कोरोना विषाणू या बाबत प्रशिक्षण देण्यात येईल असे सांगितले आहे .अडचणीच्या वेळी फक्त आणि फक्त आमची आशा सर्वांना दिसते ज्यावेळी मानधन वाढीसाठी मोर्चा आंदोलन करतो त्यावेळी सांगितले जाते कि आशा कुठे काय करते ? आमच्या आशा ना शासकीय कर्मचारी ना कंत्राटी कामगार या तर रोजणदारी कामगार म्हणून काम करतात *आशा* या नावातच सर्व काही दडलेले आहे या सर्व आशा आम्ही कधीतरी कर्मचारी होऊ या आशेवर आशा ठेवून बसले आहेत आम्ही ही समाजाचा घटक आहोत . आम्ही ही ताठ मानेने आरोग्याचे काम करु आता तरी आमच्या कडे सरकारने लक्ष्य द्यावे व त्या त्या विभागाच्या कर्मचारी यांना ही सांगण्यात यावे एकटी आशा सर्वत्र दिसते आहे सर्व्हे पण करायचा यादी ही देयचे नोटीस ही लोकांना घरपोच पोच करायचे एक एक आशा किती जणांना भेटी देणार .तरी आशांना सुरक्षा साधने लवकरात लवकर द्यावे
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji