कॉम्रेड तुला लढाव लागेल

कॉम्रेड तुला लढावं लागेल 

                   अमेझॉन च्या जंगलात लागलेल्या आगीत जळालेल्या त्या चिमणी पाखरांच्या घरट्यासाठी,अंतिम ध्येय गाठण्यासाठी,2019 च्या पुरात वाहून गेलेल्या त्या पाटीवरच्या पेन्सिल साठी तुला लढावं लागेल

                    वाचवा वाचवा म्हणून किंकाळणाऱ्या त्या आवाजासाठी,ऍसिड टाकून विद्रुप कुरूप झालेल्या तिच्या चेहऱ्यासाठी,नग्न अवस्थेत काढलेल्या धिंडेसाठी तुला लढावं लागेल 

                    पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवासाठी, मातीच्या कणासाठी,पाण्याच्या थेंबासाठी,कडकडणाऱ्या विजेसाठी,संकटांवर मात करण्यासाठी,वेली वरच्या फुलांसाठी तुला लढावं लागेल

                    गुदमरून मेलेल्या कामगारांसाठी,शहीद झालेल्या जवानासाठी,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी,फासावर गेलेल्या भगतसिंग साठी तुला लढावं लागेल

                     अदृश्य स्वप्नांसाठी,जुलमी सत्तेविरुद्ध सशक्त संघर्ष करण्यासाठी,ढीगभर दौलत कमवून बसलेल्या जहागीराविरोधी तुला लढावं लागेल 

                    तेहत्तीस कोटी देवांच्या मंदिरांच रूपांतर ग्रंथालयामध्ये करण्यासाठी,सॉक्रेटिस, बुद्ध, कोपर्निकस, तुकाराम, अश्फाक, ग्वेरा, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश, वेमुला यांच्या इतिहासाची पाने जुळवण्यासाठी तुला लढावं लागेल

                      शेवटी ओस पडलेल्या शरीराला निर्जीव झालेल्या देहाला हिंमतीने जिवंत व्हावं लागेल पुनर्जन्मासाठी नाही तर तुज्यासाठी लढणाऱ्या कॉम्रेड ला साथ देण्यासाठी तुला लढावं लागेल


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या