कडेगाव:-अमरापूर येथे इ.1ली ते5वीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंम्मेलन आकर्षक,भव्य व दिव्य असे झाले.याचे उद्घाटन पं.स.चे उपसभापती आशिष घार्गे यांचे हस्ते झाले यावेळी सभापती मंगलताई क्षीरसागर, केंद्रप्रमुख मधुकर जंगम,शाळा व्यवस्था पन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रा.प. उपसरपंच,ग्रा.प.सदस्य,मार्केट कमिटीचे सदस्य,पुढारीचे तालुका प्रतिनिधी संदीप पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा जंगम व सर्पंव शिक्षक, सं चे माजी सदस्य,हजारो ग्रामस्थ व शाळेतील सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. सम्मेलनामध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थी यांचा प्रमाणपत्रासह गौरव झाला.एकूण 30 गीतांचे बहारदार सादरीकरण झाले. शिवरायांचे आगमन प्रत्यक्ष घोड्यावरुन झाले.हे दृश्य विलोभनीय होते.हे स्नेहसंम्मेलन विद्युत रोषणाईने आकर्षक होते. प्रेक्षकानी बक्षिसांचा वर्षाव करुन शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचे कौतुक केले.या सम्मेलनात तानाजी देशमुख व आप्पासो जाधव,अशोक शेवाळे यांचा सत्कार झाला.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji