आशांना जिवंतपणी मानधन द्या

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जीव धोक्यात घालून गावागावात सर्व्हेचे काम करणाऱ्या आशा स्वयंमसेविकांना शासनाने विमा कवच देण्याचे घोषणा केली .मात्र मुत्यूनंतरचा विमा नको ,जिवंतपणी मानधन द्या,असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कारण बहुतांश आशा या हातावरच्या पोटावरील आहेत सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अन्य रोजगार हिरावल्याने किमान मानधनाचा तरि आधार मिळावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत सर्व्हेचे काम आशांवर सोपवले आहे. मास्क,सँनिटायझरसह अन्य संरक्षणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना हे काम सुरू आहे शासनाने त्यांच्यासाठी विमा कवच देण्याची घोषणा केली. पण मानधनची कोणतीही तरतूद अद्याप तरी केलेली नाही मुळात बहुतांश आशा या हातावरच्या पोटावरील कुटुंबातील भागातील रोजगार ठप्प आहेत अशा अडचणीच्या परिस्थितीत शासनाने अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.                       *दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील आशा* १)ग्रामीण भागातील आशा :- १९००   २) सांगली , मिरज कुपवाड, शहर आशा  :-१००   ३)  गटप्रवर्तक :- ९५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या