या फोटोत एक सैनिक खांद्यावर गाढव घेऊन जाताना दिसतोय. त्याला गाढवाबद्दल खुप प्रेम आहे असं नाही परंतु त्या जमिनीमध्ये बॉम्ब आहेत. गाढव मोकळे सोडले तर सर्वांना घेऊन मरेल. नेमकी तीच परिस्थिती आज आहे आपल्याला आपल्या परिसरातील सर्व गाढवं सांभाळावी लागतील नाहीतर ती आपल्याला देखील घेऊन मरतील. आपल्या परिसरात अशीच गाढवे असतील तर त्यांना आवर घाला. ऐकत नसतील तर प्रशासनाला कळवा.
आपण आता कोविड19 या आजाराच्या स्टेज 3 मध्ये चाललो आहोत. या मध्ये संपुर्ण समाजात आजार पसरत आहे.याचा आगडोंब कधी भडकणार हे आपल्याला समजणार नाही. एक आठवडा बिलकुल घराबाहेर पडू नका. दुकाने कमीत कमी उघडा. जगलात तर धंदे नाहीतर मरण. घरात जे असेल त्या वर भागवा. जर स्टेज 3 मध्ये अडकलो तर आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. आपल्या देशात पुरेसे व्हेंटिलेटर नाहीत.ते मिळाले तर प्रशिक्षित स्टाफ नाही. सेपरेट आयसोलेशन हॉस्पिटल नाहीत त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेऊन आपल्यातला गाढवपणा कमी करुनन आपण माणसासारखे घरी बसू. दारे लावून घेऊ. आठवडा
महत्वाचा आहे. जवळच्या मित्रांना सांगा. लक्षात ठेवा आजार आला तर मयतीला सुद्धा कोणी येणार नाही. काळजी घ्या. स्वतःसोबतच गावालाही सुरक्षित ठेवा.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji