|| भूकेच्या भूकंपाची भीती मोठी होती ||

घरात पुर्णपणे सुरक्षित रहा .... हे पालन करत आपल Mediaच कर्तव्य बजावण्याकरिता जेव्हा घरा बाहेर पडले .... काळीज फाडणार दृश्य नजरेला भिडलं .... सुन्न असलेल्या रस्त्यावर या थकलेल्या आईच्या अंगावर जीव कासावीस होऊन रडणार तिच मुल दिसल  .... तिच्या खूप प्रयत्नानेही ते रडणार मुल शांत होत नव्हत व हे करत असताना ही आई कोणाची तरी आतुरतेने वाट पाहतनाही  दिसली .... काही वेळा तर ती भिंतीवर आपल डोकं ठेवून डोळे मिटत होती  .... रस्त्यावर ठिकठिकाणी मला कोणी दिसत नव्हतं की जे तिच्याकडे येणार असेल .... 

मला राहवलं नाही व तीला धीर देत विचारल .... आपण इथं भर ऊन्हात का बसून आहात कोणाची वाट पाहत आहात का ताई ? .... घरी जा आपल्या मुलीला घेऊन आराम करा .... बाहेर पडू नका .... 

एवढ्यात ती म्हणाली मी माझ्या यजमानाची वाट पाहत आहे .... हा गोळा केलेला पानांचा पाचोळा आम्ही विकायला निघालो आहे  ज्याच्यातुन 50 ते 60 रू मिळत .... अशी आज 2  पोती आम्ही जमा केली व विकण्यास निघालो पण मला थोडी चक्कर आल्यामुळे मी इथंच खाली बसली ताई ... मग माझ्या यजमानांनी मला इथच बसून राहण्यास सांगितले व ते एकटेच यातील एक पोत घेऊन विकण्यास गेले .... त्यांचीच परतान्याची वाट पाहत आहे .... येताना काही तरी खायला आणतो म्हणाले ....हे ऐकून माझ्या अश्रूंचा न आवरणारा बांध फूटला .....स्वतःला कठोरतेने सावरत विचारल 

पण बाहेर सगळंच बंद आहे ताई हे माहित नाही का आपल्याला असे विचारताच त्यावर तीने मला प्रश्नात्मक विचारल .... म्हणजे आज आमची पानं कोणीही विकत घेणार नाही का ? ... एक पोत जरी आज 40 रू गेल तरीही चालेल ....  उद्या पानं सकाळी जरा  लवकरच उठून गोळा करू व लवकरच विकण्यास येऊ ..... आता माझ्या मुलीचा जीव भूकेने कासावीस होत आहे ताई म्हणून ती इतकी रडत आहे .... आज हे का लौकर येईना याचीच मी वाट पाहत आहे ....... 

नाही रहावलं मला हे येकून .... नाही राहवलं .... या आईला स्वतःची काळजी नव्हे तर तीच्या चिमुकलीची काळजी ? भुक मोठी का हा विषाणू मोठा ? मला कळालेच नाही कारण त्या परिस्थितीतशी झुंज ही एक आई देत होती .... मग नक्कीच या क्षणाला तिला व कुठल्याही अईला भूकेच्या भूकंपाची भीती मोठी असेल....

CORONAVIUS मुळे ISOLATION करा ? .... हे मी या पुस्तकी अनाडी पण सगळ्यात सुशिक्षित व प्रेमळ आईला समजवुच शकले नाही ..... कंठ दाटून येऊ लागले ... 

तीच्या तहानलेल्या मुलीच्या भूके समोर मी या आईला समजवु व समजूही शकले नाही की *भूकेच्या भूकंपाच्या भीती पेक्षा ही मानव निर्मित विषाणूची भीती मोठी* आहे ?.... कारण तीच्या कासावीस झालेल्या भुकेल्या बाळाच्या रडणार्या आवाजाने  माझ काळीज फाटू लागले होत ....

एका क्षणाचाही विलंब न लावता .... माझ्या जवळील  होत नव्हत ते या माऊलीला दिल .... योगायोगाने मग तीच्या पिल्लूच रडण हळूहळू थांबल व या आईच गरगरणही ....या आईच्या चेहर्यावर एक आनंदी हास्य उमटल .... 

मग कुठे जाऊन तीला या विषाणूची सावधगिरीची माहिती व गांभीर्य समजवल ..... माझजवळ extra मास्क किंवा स्वच्छ हात रुमाल बाळगाल्याने ते या माऊलीला देत असताना तीच गोजिरवाण पिल्लू हळूहळू हसू लागल .... शांत झालेल्या चिमुकलीच्या आईला हसताना पाहून मी समजले तीला विषाणूची भीती अजिबात नव्हती पण आपल्या मुलीच्या भूकेची आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची काळजी होती .... कारण तिला इतके वर्ष याचीच हवय होती....

  थोड्यावेळाने तीचे यजमान जे एका पायाने अधु दिसले कसेबसे चालत हताश मनाने न विकल गेलल पोत तसेच घेऊन परतताना दिसले .... 

यांच्याशीही मी बोलले व काही वेळाने ते आपल्या झोपडीकडे समाधानाने निघाले  .... त्या भुकेल्या माऊलीने  जाताजाता भरभरुन आशिर्वाद दिले .... काही क्षणातच तीच्या चेहर्यावर समाधान होते ..... पण माझ्या मनात मात्र प्रश्नांच वादळ

अनेक विचारांनी मला घेरले.... ह्यांच व अश्या अनेक कुटुंबांच उद्या पासून काय  ? या  8 ते 10 खबरदारीच्या दिवसात  या व अश्या अनेक आईंनी कुटुंबांनी जगायचे कसे  ? 

या अचानक उद्भभवलेल्या विपत्तीच्या काळात आपल  सरकार आज सगळंयाच ठिकाणी पोहचू शकत नाही ....

 पण या काळात जमल्यास आपण On Field चे पत्रकार व अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी सर्व खबरदारी घेऊन बाहेर पडणारे जागरूक नागरीक हे नक्की करू शकतो ...आपल्या जवळ घरातील थोडं अन्न व पाणी बाळगा आपल्या जवळच अस कोणी ऊपाशी पोटी तडफडताना दिसल ना 1.5 मिटरच अंतरावरून का होईना पण खाऊ द्या आपल्या माणसांना , इतर प्राणीमात्रांही  .... 

Journalist - Asmita
*Let's Live And Make Humanity Live Too*