पलुस :-पलूस तालुक्याची कोरोना साथ हाताळणाऱ्या कोणत्याच प्रशासकीय अधिकाऱ्याकडे N95 मास्क नसतील तर आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, स्टाफ, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याकडे कोठून N95 मास्क येणार...
आरोग्यसेवेत काम करणाऱ्या एक जरी कर्मचारी उद्या जर कोरोना पॉझिटिव्ह आला तर संपूर्ण तालुक्याला किती मोठी किंमत मोजावी लागेल...
आज पलूस तहसीलदार कार्यालयात पलूसमधील खाजगी हॉस्पिटल धारकांची एक महत्वाची मीटिंग आयोजित केली होती, मीटिंगमध्ये उपस्थित असणारे पलूसचे तहसीलदार माननीय राजेंद्र पोळ साहेब, पलूसचे बीडीओ श्री रोकडे साहेब, पलूसचे पोलीस निरीक्षक श्री विकास जाधव साहेब, ग्रामीण रुग्णालय पलूसचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अधिक पाटील व पलूस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रागिणी पवार मॅडम हे तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांच्यापैकी कोणाकडेही N95 मास्क नव्हते. पंधरा दिवसांपूर्वी आम्ही पलूस तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सर्व डॉक्टर्सनी वर्गणी काढून काही N95 मास्क उपलब्ध केले होते, त्यापैकी डॉ पवार हॉस्पिटल पलूस तर्फे तालुक्याच्या या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोफत N95 मास्क आज देण्यात आले...
येणाऱ्या काळात पलूस तालुक्यातील सर्व डॉक्टर्स, नर्स, स्टाफ, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सर्व पोलीस बांधव अश्या एकूण 500 जणांना सर्वांच्या सहकार्याने N95 मास्क उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मी आजच्या मीटिंग मध्ये दिले आहे...
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji