सांगली :- आज २१ एप्रिल सीटूच्या वतीने निषेध दिन संपूर्ण सांगली जिल्ह्यात साजरा करण्यात आला, जिल्ह्यात ६०प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यापैकी २५ ठिकाणी आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या ,त्या मध्ये ग्रामीण भागातील २०ते २५ गटप्रवर्तक, ३००च्या आसपास ग्रामीण भागातील नागरी आशा सांगली शहर 40 आशा सहभागी झाल्या ,संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा काॅ मिना कोळी यांच्या नेतृत्वात पाळण्यात आला. भाषण नको रेषन द्या.भाषण नको वेतन द्या. आरोग्यविषयक सुरक्षितता प्रदान करा.उत्पन्न करातून सूट मिळालेल्या प्रत्येक माणसाच्या खात्यात तिन महिन्यासाठी ७५०० रू प्रतिमहा जमा करा.स्थलांतरित गरजूनां अन्नधान्यचा पुरवठा करा.आशा व गटप्रवर्तक यांना कोरोणा सर्वेचा किमान २००रू प्रतीदिन प्रमाणे मोबदला अदा करा.कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा.इत्यादी मागण्या घेऊन आज हे आंदोलन करण्यात आले
*जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी*
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji