लॉकडाऊन सूरू आहे. ....
..देशातील दळणवळण, उद्योग,व्यापार,बांधकाम, कार्यालये,शाळा-महाविद्यालय बंद आहेत. दररोज हजारो कोटीची उलाढाल बंद आहे.२१ दिवसाचा लॉकडाऊन यशस्वी करून कोरोणा संपवायचा आहे.देशाची आरोग्य यंत्रणा काम करित आहे. ज्या व्यवस्थेच्या भरवशावर आपण ही स्वप्न पाहत आहोत ती आरोग्य यंत्रना शेवटची घटका मोजत आहे.दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषधी नाही, औषधी आहे तर अपेक्षित कर्मचारी नाही.अद्ययावत तपासणी मशीनरी नाहीत. अशी अवस्था आपल्या आरोग्याची झाली आहे.एकून जिडिपिच्या ३% सुद्धा निधी आरोग्यासाठी बजेट मध्ये तरतूद नसते.मोठ्या प्रमाणात आरोग्याच खाजगीकरण झाले आहे. कंत्राटी कर्मचारी आणि आशा व गटप्रवर्तक यांच्या भरवशावर आपण आज कोरोणा सारखे विषाणू चा बंदोबस्त करायला निघालो. आज आमची आशा वर्कस आणि गटप्रवर्तक जिवाची बाजी लाऊन बाहेरच्या शहरातून खेड्यात असंघटित मजुराचे लोंढेचे लोंढे येत आहेत. तळहातावर पोट असलेले हे लोक त्यांची घरोघरी जाऊन विचारपूस करणे,कोरोणा संशयित असेल तर त्याच्या हातावर शिक्का मारणे,त्याच्यावर नजर ठेवणे, अनेक लोक हे शेतावर,वाड्या वस्त्यावर,जंगलात निवारा करीत आहे त्या ठिकाणी जाऊन आशा वर्कर त्याची नोंद करीत आहे. जीव मुठीत घेऊन हे लोक काम करित आहेत. यांना आरोग्य विभागाकडून ना मास्क्, हँडग्लोज,सँनिटाईजर, एँप्रण ना कुठली सुरक्षा! शस्त्रा विना सैन्य लढत आहे. सांगा लढाई कशी जिंकणार!
आर्थिक बाबतीत म्हणाल तर ना फिक्स मानधन ना वेळेवर मोबदला.विधान सभेच्या निवडणूकीपर्वी त्यांना २ हजार रुपये मानधन देण्याचे कबूल केले होते अजून पर्यंत तो निर्णय झाला नाही. काम म्हणाल तर एक कोणीच मालक नाही. जो ऊठतो तो काम सांगतो.आरोग्य कर्मचारी कामावरून काढण्याच्या सातत्याने धमक्या देऊन त्यांच्या कडून फुकट कामे करून घेतात.कमजोर वर्गाला बळी देण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji