शाहिर दिपक गोठणेेकर

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या साठी काय केलं ? हे म्हणणाऱ्यांनो आज तुम्ही जे घरात जिवंत आहात हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच, US मध्ये ट्रम्प ला lockdown Declare करायची पॉवर नाही पण भारता मध्ये मोदींनि फक्त चार तासांत पूर्ण भारत Lockdown केलं..बाबसाहेबांची दुरदृष्टी किती जबरदस्त होती हे दिसून येत ह्यामधून...

म्हणूनच आम्ही बोलतो "We are Because He was"

अधिक माहितीसाठी खाली दिलेला लेख जरूर वाचावा.

भारतीय संविधानातली ताकत आज अमेरीकेतही नाही. ट्रम्प हतबल तर मोदी फार्मात.
Salute to Dr.B.R.Ambedkar...
भारताचे PM मोदी भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करू शकतात.
 अमेरिकेत ट्रम्प मात्र ते करत नाहीत. 
भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या चौपट आहे.
 ३२ कोटींच्या अमेरिकेत २,४०,००० रुग्ण आहेत. ६,००० मृत्यू झाले आहेत.
 एका दिवसात १,००० लोक #कोरोनामुळे गेले. 
तो देश भयभीत झाला आहे. 
तरीही ट्रम्प तिथे लॉकडाऊन जाहीर करत नाहीत.
मोदी मात्र सहजगत्या लॉकडाऊन जाहीर करतात आणि अवघ्या देशात काही तासात शुकशुकाट होतो.
जगाला आश्चर्य वाटत राहाते. 

यात मोदी वा ट्रम्प हा मुद्दा नाही. 
मुद्दा आहे तो, 
डाॕ बाबासाहेब आंबेडकरांनी  दिलेल्या संविधानाचा. 

अमेरिकेतील थोर संपादक, अभ्यासक #फरीद_झकारिया म्हणताहेत. 
 "Modi could impose lockdown, Trump doesn't have that power."
अशी मांडणी करत फरीद म्हणतात, 

' _भारताच्या राज्यघटनेत केंद्राकडे जी शक्ती आहे ती अमेरिकेत नाही.

भारतात 'फेडरल' व्यवस्था आहे, 
तर भारत हे 'युनियन' आहे. 
त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष अशा वेळी उपस्थितही होत नाही. 

अमेरिकेत ५० राज्ये आहेत. देशासोबत प्रत्येक राज्याचे नागरिकत्व वेगळे. 
राज्ये त्या अर्थाने स्वायत्त आहेत. 
त्यामुळे अध्यक्षांना, राज्यांना डावलून, या स्वरूपाचे निर्णय घेता येत नाहीत. 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हेतूतः 'युनियन', 'संघराज्य' हा शब्द राज्यघटनेत वापरला. 

अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स. 
तिथे राज्ये एकत्र येऊन देश स्थापन झाला. 

भारतात, आधी देश आकाराला आला आणि 
मग प्रांतरचना झाली. 
 नेशन फर्स्ट!
म्हणून, ही शक्ती संविधानामुळे मोदींना मिळते. 

किती minutely  विचार केला होता आपल्या डाॕ बाबासाहेब आंबेडकरांनी!🙏
 म्हणून, 
#भारत एक संघ आणि 
महान आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद ✊✊✊✊🙏