मुंबई :- महाराष्ट्र मध्ये बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन केले आहे. या मंडळामध्ये सेसच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये जमा आहेत. 23 मार्च पासून लाक डावून झाल्यानंतर आणि त्यापूर्वीही अनेक महिन्यापासून बांधकाम कामगारांना काम मिळत नाही व त्यांची उपासमार चालू आहे हे सर्व आपणास माहीत आहे. लाक डाऊन झाल्यानंतर तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम मजुरांना आर्थिक साह्य मिळावे याविषयी यापूर्वीही आपणास पत्र लिहिले आहे.राज्याचे मुख्यमंत्री, कामगार आयुक्त, यांनाही यासंदर्भात पत्र लिहून विनंती केली आहे .
परंतु खेदाने नमूद करावे लागत आहे की अद्यापर्यंत याबाबत निर्णय झालेला नाही. निधी असूनही आपण बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य दिले नाही. केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्य सरकारांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम मजुरांना आर्थिक सहाय्य दिले आहे व या संकट काळात मदत केली आहे .तरी आपणास विनंती आहे की तातडीने बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याबद्दल निर्णय करावा. प्रत्येक नोंदीत कामगारांच्या खात्यामध्ये कमीत कमी पंधरा हजार रुपये ताबडतोब ट्रान्सफर करावेत अशी आपणास विनंती आहे. तसेच ज्या कामगारांनी नोंदणी साठी अर्ज दाखल केलेले आहेत परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही तसेच  जे कामगार नोंदीत नाहीत अशा कामगारांना ही आर्थिक मदत जाहीर करावी .

आपला ,
डॉ. डी एल कराड,
 राष्ट्रीय उपाध्यक्ष सिटू