पलुस :- संघटनेच्या मागणी नुसार पलुस तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉ पवार हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ अमोल पवार यांंनी कोरोना च्या लढाईत काम करणाऱ्या आशा वर्कर यांना N95 मास्क मोफत दिल्या बद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे शतशः आभारी आहे ज्या शस्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे ते N 95 मास्क म्हणजे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची ढालच म्हणा...असे एकूण 30 ते 35 N95 मास्क पलूस शहरात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना मोफत वाटण्यात आले...
आज आशा स्वयंसेविकांना N95 मास्क देताना डॉ अमोल पवार यांनी हा मास्क कसा घालायचा, कश्या प्रकारे पुन्हा पुन्हा वापरायचा, हा मास्क घालण्याचे महत्व याबाबतची माहिती दिली, तसेच प्रत्यक्षात आरोग्य सर्वेचे फिल्डवर काम करताना सर्वे करताना नेमकी कोणकोणती माहिती घ्यायची याबद्दलची माहिती देण्यात आली,
1000 लोकसंख्येला 1 आशा सेविका याप्रमाणे एकूण 15 दिवसात त्यांना 300 ते 350 घरांचा सर्वे करायचा असतो, यामध्ये परदेशातून किंवा पुणे, मुंबई सारख्या बाहेरच्या शहरातून आलेल्या व्यक्तीची माहिती, ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असलेले रुग्ण याची माहिती एकत्रित करून द्यायची असते, ही माहिती गोळा करताना आपल्याला SARI(Severe Acute Respiratory tract Infection), ILI (Influenza like Illness) अश्या रुग्णाच्या प्राथमिक लक्षणांची माहिती कशी गोळा करायची, प्रत्येक घर व व्यक्तीचा सर्वे किती महत्वचा आहे याची जाणीव करून देण्यात आली, तसेच आपण सर्वे करीत असताना चुकून आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी स्वतः काय काय काळजी घ्यायची याचीही माहिती डॉ अमोल पवार यांचेकडून देण्यात आली...
एक आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित झाल्यास जवळजवळ 400 लोकांना संक्रमण करू शकतो म्हणूनच आपल्या गावातील, किंवा शहरातील प्रत्येक आरोग्य कर्मचारी व त्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी N95 मास्क महत्त्वाचे आहे हे नक्की....
स्वतः या N95 मास्क बरोबर सर्वांनी ग्लोव्हज घालणे गरजेचे आहे, तसेच आपले काम झाल्यानंतर प्रत्येक वेळेस आपले हातपाय स्वच्छ कसे व का धुवायचे ते सांगितले... तसेच हे मास्क निर्जंतुक करून आपण पुन्हा पुन्हा कसे वापरू शकतो याचीही माहिती दिली, काळजी घ्यायची या सर्व गोष्टीची माहितीही देण्यात आली...
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji