कोरोनाच्या काळात ही आघाडीवर राहून आपली सेवा बजावणारी आशा स्वंयमसेविका अंजली शिंदे यांनी काल रात्री ANC ज्योती अजित अहिवळे हिला डिलिव्हरी साठी प्रा आ केंद्रा मध्ये घेऊन गेली ती एक तर तिसऱ्या खेपेची होती तरी ही कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे अपुरे स्टाफ रात्री ची वेळ त्यामुळे रेफर चिठ्ठी करुन पेशंट सिव्हिल ला घेऊन जाण्यास सांगितले जिल्हा रुग्णालयात जाण्यास किमान १ तास वेळ लागतो मिरज जवळ आहे पण तिथे कोव्हीड १९साठी रुग्णालय असल्याने पुढे सांगली सिव्हिला जावे लागते.आशा वर्कर्स, पेशंट, व नातेवाईक तिची आई असे रिक्षाने जात असताना पेंशट ला अचानक पेन्स वाढल्यामुळे नाईलाजाने रिक्षा एका घराजवळ थांबवून ANC ला आत घेतली स्वच्छ हात ब्लेड धागा ह्या सर्व गोष्टी नियमान उपलब्ध करून हातात ग्लोज अथवा कोणतेही डिलिव्हरी किट सोबत नसताना एकही खाजगी डॉक्टर येईनात तरी स्वता: आशा वर्कर्स यांनी धाडसाने डिलिव्हरी केली बाळाची नाळ कट करुन धाग्याने बांधली प्लॅसेंटा आऊट झालेवर बाळाला अर्ध्या तासाच्या आत स्तनपान दिले व गुंडाळून मातेच्या जवळ दिले .आता आई व बाळ व्यवस्थित आहेत. कोणतेही त्रास नाही रात्री चे १:३०च्या सुमारास सर्व कार्य करुन आपली सेवा बजावून आशा वर्कर्स घरी परतल्या त्यांच्या या कार्याला सलाम
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji