अंगणवाड्यानां पुरक पोषण आहार  बनवुन देणार्यां महीला बचत गटांचे काम गेल्या मार्च महिन्यापासून बंद आहे, सरकारने कोविद प्रसार रोखण्यासाठी आंगणवाड्या व शाळा बंद ठेऊन ताज्या शिजलेल्या आहार च्या बदलल्यात सुके धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले पुर्ण राज्याचे काम महाराष्ट्र राज्य कन्ज्युंमर सहकारी को. आप . फेडरेशन ला दिल्याने  महाराष्ट्र राज्यातील बचत गटांना उपासमारीची वेळ आली आहे.

बेरोजगारीने बेहाल झालेल्या महीला शासनाच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून गेल्या अनेक दिवसांपासुन आंदोलन करत आहेत.
ताजा आहार पुरवठा सुरु होईपर्यंत कमीत कमी सूखे धान्य वाटण्याचे काम बेरोजगार झालेल्या बचत गटांना द्या . एकाच फेडरेशन ला काम देऊन आघाडी सरकारने सूप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे.सरकारने हे ताबडतोब बंद करावे व ते काम गटांना द्यावे अन्यथा राज्यभरातील गट अधिक व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरकारला दिला.

नागपूर वर्धा अमरावती मुंबई सातारा पुणे अशा अनेक ठीकाणी महीला रस्त्यावर उतरून सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध करत आहेत.सरकारने नोंद घ्यावी.महीला रोजगारचा निर्माण झालेला तीव्र प्रश्र्न तातडीने सोडवावा.