सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकरी विनायक हेमाडे यांच्या चार एकर कोथिंबिरीच्या पिकाला १२लाख ५२हजिरांचे विक्रमी उत्पन्न मिळाल्याने परिसरात चर्चा होत आहे हेमाडे यांनी ४एकर क्षेत्रामध्ये ४५ किलो कोथिंबीर चे बियाणे पेरले होते .४१दिवस पिकाच्या वाढीसाठी चांगली मेहनत घेतली दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी हेमाडे यांना कोथिंबिरीची मागणी केली .हा व्यवहार १२लाख ५१हजार रुपयांना निश्चित झाला. शेतकऱ्यांला भरघोस उत्पन्न मिळाल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय आहे. हेमाडे यांनी हिमतीवर कुठल्याही प्रकारची पुढील बाजारभावाची अपेक्षा न करता कोथिंबीर पिकाची लागवड केली होती या शेतकऱ्यांला लागवडीचा निश्चितच फायदा झाल्यामुळे त्यांना आंनद गगनात मावेनासा झाला आहे
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji