आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्याची पुर्तता दिवाळी पुर्वी व्हावी यासाठी दि ५/१०/२०२० रोजी मंत्र्यांच्या व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या निवासस्थानी मोर्चा धरणे आंदोलन घेराव व तीव्र निदर्शने
महाराष्ट्र शासनाने जुलै २०२०पासून आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात अनुक्रमे रु २००० व रु ३००० वाढ केलेली आहे सदरील आदेश काढून चार महिने होवून गेले तरी पण अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ७२हजार आशा स्वंयमसेविका व ४हजार गटप्रवर्तका मध्ये शासनप्रति तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे दिवाळी अवघ्या दहा दिवसावर येऊन पोहोचली आहे दिवाळीपूर्वी मानधनवाढीचा थकबाकी मिळावी अशी आशास्वंयमसेविका व गटप्रवर्तकांनी प्रामाणिक पणे काम करून शासन व प्रशासनाला खंबीर साथ दिली आहे कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने त्याच्या प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे पंरतु आतापर्यंत शासनाने आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रश्नाबाबत वेळ काढुपणा केलेला आहे
आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत जुलै २०२०पासून आशा स्वंयमसेविका रु २००० प्रतिमहा व गटप्रवर्तकांना रु ३००० प्रतिमहा मानधन वाढवले आहे त्याची थकबाकी दिवाळी पुर्वी द्यावी. आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांना वेतनश्रेणी लागू करून सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावे ,समान कामास समान भत्ता नुसार नागरी आणि ग्रामीण आशा स्वंयमसेविकांना प्रतिदिन ३००रु कोरोनाच्या कामासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा ,६२५ रु गटप्रवर्तकांचा बंद केलेला दैनिक भत्ता पुर्ववत तात्काळ सुरू करावा अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांना रु २०००भाऊबीज भेट या दिवाळी पासून देण्यात यावी या मागणीसाठी दि .५/१०/२०२० रोजी राज्यातील सर्व मा मंत्रीमहोदय व सत्ताधारी पक्षाचे सर्व मा आमदार यांच्या निवासस्थानी कृती समितीच्या वतीने मोर्चा ,धरणे आंदोलन,घेराव, तीव्र निदर्शने करून आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधायचे आहे
जिल्हा अध्यक्ष मिना कोळी जिल्हा सचिव उमेश देशमुख, जिल्हा संघटक हणमंत कोळी
सुरेखा जाधव, अंजु नदाफ, मयुरी लेंगरे,सुवर्णा सणगर, रुपाली महाडिक ,शबाना आगा मंजुषा साळुंखे ,ऋतुजा पाटील ,वर्षा ढोबळे
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji