नांदेड :-जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते लढाऊ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गंगाधर गायकवाड (activist - ie.Earned Good Press National Newspaper THE HINDU.) यांचा सन्मान करून अखिल भारतीय पत्रकार एवं संपादक असोसियशन नवी दिली शाखा हदगांव यांच्या वतीने कोविड योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लॉक डाऊन काळात जिवाची पर्वा न करता कॉ.गंगाधर गायकवाड हे रस्त्यावरची लढाई लढून सामान्य कामगार कष्टक-यांना न्याय देण्यासाठी झुंजारपणे लढत होते.राजस्थान,बंगाल,केरळ तसेच पक्षाचे निगडीत कामगार नांदेड येथे अडचणीत अडकल्याचे त्यांना कळल्यावर त्यांनी निर्भिडपणे रस्त्यावर उतरून संबंधित कामगारांना मदत केली आहे.जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे.
अन्यायाच्या जोखडात अडकलेले कामगार कर्मचारी उदाहरणार्थ आशा,गट प्रवर्तक,रेल्वे मजदूर,कंपनी कामगार,विद्यापीठातील कामगार,असंघटीत कामगार, ॲटो व वाहन चालक, उमेद व सीटू संलग्न असलेले अनेक कामगार यांना न्याय मिळावा म्हणून नांदेड मध्ये त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत.
या काळात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील झाले आहेत.परंतु त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यानी गुन्ह्याची तमा न बाळगता रस्त्यावरची लढाई कोरोना काळात लढली असून आज त्यांचा सन्मान अखिल भारतीय पत्रकार एंव संपादक असोसियशन च्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. ते संवेदनशील कामगार पुढारी असून त्यांनी द हिंदू या राष्ट्रीय इंग्रजी वृत पत्रासाठी गुड प्रेस मिळवून ,नोंद करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गरीबांच्या मागण्या घेऊन लढत असताना गंभीर गुन्ह्याची नोंद होत असली तरी पर्वा नकरता लढणा-या लढाऊ कामगार नेत्यांना आज नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते कोविड योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याला सलाम व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
असोसियशन च्या वतीने पत्रकार धर्मराज गायकवाड ,सचिन मुगटकर, संतोष वाघमारे,श्याम लाहोटी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्थळ - मा.जिल्हाधिकारी,नांदेड यांचे कार्यालय.
दि.03/11/2020.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji