जत दौऱ्यावर असलेले केंद्रीय राज्यमंत्री मा ना रामदास आठवले यांना आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढी बाबत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विषय मांडावा याबाबत चे निवेदन कॉ हणमंत कोळी यांनी दिले
महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७० हजार आशा व ४००० हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत त्यांना कानावर आधारित मोबदला मिळतो तो सुध्दा अत्यंत कमी त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही त्यांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काम करीत असून त्या आरोग्य विभागाचा कणा आहे तरी आपण येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढ विषय मांडणी करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी आशा स्वयंसेविका रेशमा शेख, सरिता व्हनकंडे उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji