सांगली :- सांगली जिल्ह्यात आशा स्वयंमसेविका २००० व गटप्रवर्तक ९८ असे मिळून २०९८ महिला आरोग्य विभागात काम करत आहेत .आशा स्वयंमसेविका ह्या आरोग्य विभागाच्या सध्या च्या परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. पण अलीकडे एक घटना घडली आहे ते म्हणजे विटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंमसेविका शकिला मुजावर ह्या ट्रेनिंग साठी जात असताना त्यांचा अपघात झाला व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व डोक्यातून भरपूर प्रमाणात रक्त गेले व त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.त्यानंतर त्यांच्या वर उपचार करण्यात आले .पण हॉस्पिटल चे बिल भरमसाट झाले .पण त्या आशा स्वयंमसेविका ची घरची परिस्थिती फार बिकट आहे .बिल भरणे ही शक्य नाही .पण केंद्र व राज्य सरकारने आशा स्वयंमसेविका साठी दोन विमा योजना लागू करण्यात आले आहे पण त्या योजना असून नसल्यासारखे आहेत जर आशा ची अपघाती मृत्यू झाला तरच त्या योजनेचा लाभ घेता येते जर आशा स्वयंमसेविका ला जिवंत पण लाभ घेता येत नाही तर त्या योजनेचा काय उपयोग त्यासाठी जर आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या सेस फंडामध्ये तरतूद करण्यात यावी कि जर अशी केस कधी भविष्यात घडली तर जिल्हा परिषद मार्फत त्या आशा स्वयंमसेविकाला ज्या कुठल्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात येत त्या हॉस्पिटल चे जे काय मेडिकल व उपचारादरम्यान जे बिल होईल ते जिल्हा परिषद मार्फत भरण्यात यावी व जिल्हा परिषद च्या सेस फंडामध्ये आशा व गटप्रवर्तक यांच्या साठी स्पेशल तरतूद करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गट नेते व जिल्हा परिषद सदस्य मा शरद (भाऊ)लाड या सर्वांना आज निवेदन देण्यात आले
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji